चंद्रपूरच्या वारसा जपण्याची युवकांची खासदारांना मागणी शहराला मुख्य प्रवेशव्दार व आय लव्ह चंद्रपूर मजकुराचे ग्लो साइन बोर्ड लावण्याची मागणी

94

चंद्रपूरच्या वारसा जपण्याची युवकांची खासदारांना मागणी

शहराला मुख्य प्रवेशव्दार व आय लव्ह चंद्रपूर मजकुराचे ग्लो साइन बोर्ड लावण्याची मागणी

चंद्रपूर : मोठ्या शहरात प्रवेश करताना त्या शहराची ओळख होत असते. परंतु चंद्रपूर याला अपवाद आहे. चंद्रपूर शहरात प्रवेश करताना शहराची ओळख करणारे प्रवेशव्दार व आय लव्ह चंद्रपूर मजकुराचे ग्लो साइन बोर्ड लावण्याची मागणी नमस्ते चांदा फाउंडेशन ने केली आहे.
यावेळी खासदार बाळू धानोरकर यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी हितेश कोटकर, सागर महाडोले, प्रितम खडसे, महेश सोमनाथे, प्रणय दुर्वे, प्रवीण पाटील, यतिश मेश्राम, जगदीश रचावार, सिद्धांत नगरकर, रोशन कोंकटवार, चेतन इंगोले, सागर मसादे, वैभव थोटे, मयूर निखारे, अनिकेत सायरे, कमलेश चटप, कौस्तुभ नागपुरे, झंकार साखरकर यांची उपस्थिती होती.
कोरोना विषाणूने लॉकडाउन लागले. यामुळे अनेकांनी घरची वाट धरली. पुणे, मुंबईत मोठ्या पदांवर नोकरीवर असलेले घरी परतले. त्यातून दुरावलेले मित्र एकत्र आले. त्यांनी एकत्र येत नमस्ते चांदा क्लब स्थापन केले. याच क्लबच्या माध्यमातून दुरावलेल्या या बालमित्रांनी समाजचळवळ सुरू केली.
चंद्रपूर शहरात देखील मोठ्या शहर प्रमाणे विकास झाला पाहिजे. हि भावना या युवकांनी मनात बाळगली आहे. मोठ्या शहरात शहराची ओळख होण्याच्या किंवा वेगळं काही वस्तू दिसत असते. परंतु चंद्रपूर येथे मात्र असल्या कोणत्याच प्रकारची वस्तू दिसून येत नाही. चंद्रपूर हे ऐतिहासिक नगरी आहे. गोंडराजाच्या वारसा ह्या शहराला लागला आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यान, उद्योग अनेक महत्वाचे ठिकाण आणि वारसा या शहराला लाभला आहे. त्यामुळे या शहराची ओळख नवीन पिढीला होण्याकरिता नमस्ते चांदा फाउंडेशन ने खासदार बाळू धानोरकर यांच्याकडे मागणी केली आहे. हि मागणी लवकरच पूर्ण करण्याची ग्वाही खासदार बाळू धानोरकर यांनी युवकांना दिली आहे.