आयटीआय ची आॅनलाईन पध्दतीने प्रवेश अर्ज भरणे,अर्जात दुरूस्ती करणे,प्रवेश अर्ज पुर्ण भरल्यानंतर प्रवेश अर्ज शुल्क जमा करणे अंतीम तारीख 30 नोव्हेंबर 2020. दुसरी प्रवेश फेरी 3 ​डिसेंबर 2020 पासून होणार सुरू.

74

मा. सर्वोच्च न्यायालय यांनी त्यांच्या दिनांक 09 सप्टेंबर, 2020 रोजीच्या निर्णयान्वये सामाजिक व शैक्षणिक दृष्टया मागास (SEBC) वर्गाच्या सामाजिक आरक्षणास दिलेल्या अंतरिम स्थगिती आदेशास अनुसरून सन 2020-21 या शैक्षणिक वर्षात प्रवेशाबाबत करावयाच्या कार्यवाहीसाठी सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन, यांचे दि.24 नोव्हेंबर, 2020 च्या शासन निर्णयान्वये प्रवेश प्रक्रीयेबाबत पुढील सुचना देण्यात आलेल्या आहेत. सामान्य प्रशासन विभाग यांचे वरील शासन निर्णयानुसार सन 2020-21 या शैक्षणिक वर्षातील प्रवेशप्रक्रीया सामाजिक व शैक्षणिक दृष्टया मागास (SEBC) वर्गाकरिता आरक्षण न ठेवता सदर वर्गात अर्ज केलेल्या उमेदवारांचा अर्ज खुल्या प्रवर्गासाठी ग्राह्य धरण्यात यावा, असे निर्देश प्राप्त झालेले आहेत. त्यानुसार SEBC प्रवर्गातुन अर्ज केलेल्या उमेदवारांनी त्यांचे प्रवेश अर्जात दि. 30 नोव्हेंबर, 2020 पूर्वी आवश्यक तेथे बदल करुन आपला प्रवेश अर्ज ऑनलाईन पध्दतीने सादर करावा. दि. 30 नोव्हेंबर, 2020 पर्यंत आवश्यक तेथे बदल करुन आपला प्रवेश अर्ज ऑनलाईन पध्दतीने सादर न केलेल्या उमेदवारांचा अर्ज खुल्या प्रवर्गातुन जागा वाटपासाठी ग्राह्य धरण्यात येईल.
प्रवेश अर्ज दुरुस्तीबाबत
प्रथम प्रवेश फेरीत प्रवेशीत उमेदवारांव्यतिरीक्त सर्व उमेदवारांना त्यांच्या प्रवेश अर्जात सादर केलेल्या माहितीत दुरुस्ती करण्यासाठी दि. 17.09.2020 रोजी सकाळी 11.00 वाजेपासुन दि.30.11.2020 रोजी सायंकाळी 05.00 वाजेपर्यंत सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. प्रवेश अर्जातिल माहितीत बदल करण्यासाठी आपल्या प्रवेश खात्यात प्रवेश करुन “Admission Activities – Grievance Redressal/ Edit Application Form” येथे क्लिक करावे.

https://admission.dvet.gov.in/

प्रवेशप्रक्रीयेमध्ये सहभागी होणाऱ्या प्रवेशोच्छुक उमेदवारांच्या सोईसाठी “MahaITI App” नावाचे Android App ची रचना संचालनालयाकडून करण्यात आली आहे. उमेदवारांनी Google Play Store मधुन सदर App Download करुन घ्यावे. सदर App व्दारे उमेदवार त्यांचा अर्ज, निवडपत्र, प्रवेश निश्चितीची पावती इत्यादी बाबी Download करु शकतात. तसेच उमेदवार आपला अर्जातील विकल्प देखील वेळोवेळी सादर करु शकतात. सबब, अधिकाधिक उमेदवारांनी सदर सुविधेचा लाभ घ्यावा.