विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती (Scholarship) योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरणे 31May 2021

164

विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती (Scholarship) योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरणे 31May 2021

विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती (Scholarship) योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरणे  31/05/2021

वसायिक पाठ्यक्रमात शिकणाऱ्या विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन योजना विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण संचालनालय 03/12/2020 31/05/2021 अर्ज करा PDF
भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना आदिवासी विकास विभाग 03/12/2020 31/05/2021 अर्ज करा PDF
इमाव प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण संचालनालय 03/12/2020 31/05/2021 अर्ज करा PDF
विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण संचालनालय 03/12/2020 31/05/2021 अर्ज करा PDF
विजाभज प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण संचालनालय 03/12/2020 31/05/2021 अर्ज करा PDF
शालांत परिक्षोत्तर(मेट्रीकोत्तर) शिक्षण घेणाऱ्या अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग 03/12/2020 31/05/2021 अर्ज करा PDF
मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग 03/12/2020 31/05/2021 अर्ज करा PDF
इयत्ता १० वी च्या परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवून इयत्ता ११ वी मध्ये प्रवेश घेतलेल्या व १२ वी मध्ये शिकणाऱ्या विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज गुणवत्तापूर्ण शिष्यवृत्ती विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण संचालनालय 03/12/2020 31/05/2021 अर्ज करा PDF

 

 

भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती सामाजिकय व विशेष सहाय्य विभाग
03/12/

2020

31/05/2021

सन 2020-21 पासून महाराष्ट्र शासनातर्फे सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी एकत्रित संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. या संकेतस्थळाचे नाव महाडीबीटी (https://mahadbt.gov.in) असून हे संचालक, माहिती व तंत्रज्ञान (DIT) यांच्यामार्फत कार्यान्वित करण्यात आले आहे.

     आतापर्यंत विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर आणि शिक्षण फी इतर शुल्काची रक्कम विदयार्थी शिकत असलेल्या महाविदयालयाच्या खात्यावर जमा करण्यात येत असे. आता देय होणारी वित्तीय लाभाची रक्कम ही लाभार्थी विदयार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे.

      विदयार्थ्यांना शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी, निर्वाह भत्ता, विदया वेतने विषयक योजनांचा लाभ मिळणेसाठी स्वत:ची नोंदणी करणे, अर्ज भरणे, अर्ज भरल्यापासून ते रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची सर्व प्रक्रिया आता राज्यस्तरीय डीबीटी (DBT) पोर्टलमार्फत करणे अनिवार्य करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर ही लाभाची रक्कम जमा केल्याबाबची सूचना डीबीटी पोर्टलद्वारे प्रत्येक महाविदयालयाला दिली जाईल. त्यामुळे संबंधित विद्यापीठ / शैक्षणिक संस्था / महाविद्यालय / तंत्रनिकेतने यारंनी कोणत्याही विद्यार्थ्यांकडून प्रवेशाच्या वेळी शिक्षण शुल्काची रक्कम घेवू नये.

      तसेच कोणत्याही विद्यार्थ्याची आर्थिक पिळवणूक होणार नाही याची योग्य ती दक्षता घेण्याची जबाबदारी संबंधित शैक्षणिक संस्थांची असेल.

डीबीटी पोर्टलवर खालील विभागच्या शिष्यवृत्ती योजना दिलेल्या आहेत.

1.सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग

2.आदिवासी विकास विभाग

  1. उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग

4.अल्पसंख्याक विकास विभाग

5.शालेय शिक्षण विभाग

डीबीटी (DBT) पोर्टलवर नोंदणी करण्याची पध्दत – माहिती पुस्तिका (User Manual)

 अ ) ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी पुर्वतयारी :-

·         विद्यार्थ्यांनी आपला आधार क्रमांक काढणे आवश्यक आहे.
·         विद्यार्थ्यांनी कोअर बँकींग सुविधा असलेल्या बँकेच्या शाखेमध्ये खाते उघडणे आवश्यक आहे.
·         विद्यार्थ्यांनी आपला जातीचा दाखला, जात पडताळणी दाखला, 10वी, 12वी तसेच मागील परीक्षा उत्तीर्ण झालेला दाखला व गुणपत्रक, जन्मतारखेचा पुरावा, रहिवास प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, प्रवेशित महाविदयालयाची माहिती, प्रवेशित अभ्यासक्रमाची माहिती, अभ्यासक्रमाचा कालावधी, बँकेच्या पासबुकची झेरॉक्स, आधार कार्ड, दिव्यांग (अपंग) असल्यास दिव्यांगाचा दाखला, शिधापत्रिका इ. कागदपत्रे तयार ठेवावीत.
 ब ) डीबीटी पोर्टलवर नोंदणी कशी करावी :-
·         आपण कोणत्याही ब्राऊझरचा वापर करुन ( उदा. Ingernet Explorer, Google Chrome/Mozilla firefox इ.)
·         पुढे https://mahadbt.gov.in या वेबसाईटवर जाऊन “नवीन नोंदणी” या बटनावर क्लिक करावे.
·         प्रत्येक विदयार्थ्याने ( ज्या विदयार्थ्यांनी यापुर्वी e-scholarship पोर्टलवर नोंदणी केली होती. त्यांनी सुध्दा )mahadbt पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य आहे. आधार क्रमांकाचा उपयोग करुन नोंदणी करावी. त्यासाठी “आधार कार्ड आहे?” असेल तर “होय” व नसेल तर “ नाही ” वर क्लिक करावे.
·         त्यानंतर “OTP” हा पर्याय निवडा.
·         वैध आधार क्रमांक टाकल्यानंतर “OTP पाठवा” बटन क्लिक करावे.
·         मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेला ओटीपी (One Time Password) टाकून “पडताळणी करा” हे बटन क्लिक करावे.
·         उपलब्ध विंडोमध्ये नाव, जन्म दिनांक, फोन नंबर, पत्ता आधार संलग्न बँक खाते नंबर इ. आधार कार्डवरील माहिती आपोआप दिसेल.
·         आधार क्रमांक नसल्यास “आधार कार्ड नाही” हा पर्याय निवडा आणि आवश्यक ती माहिती भरावी व कागदपत्रे अपलोड करावीत.
·         नोंदणी अर्जाच्या विंडोमधील सर्व माहिती भरावी.
·         स्वत:चा User Name व Password तयार करावा.
 क ) डीबीटी पोर्टलवर अर्ज कसा भरावा :-
·         महाडीबीटी पोर्टलवर Log in करण्यासाठी “Select User” वर जावून “विद्यार्थी” हा पर्याय निवडा.
·         User Name व Password टाकून Log in व्हावे.
·         Log in झाल्यावर Windows मधील “योजना तपशील” यावर क्लिक करावे. त्यानंतर विभागवार योजना आपण पाहू व निवडू शकाल.
·         तुम्हास ज्या योजनेसाठी अर्ज करावयाचा आहे त्यायोजनेसमोरी “पहा” यावर क्लिक करावे.
·         तुम्ही कोणत्या योजना जसे. मॅट्रिकोपूर्व/मॅट्रिकोत्तर( शालेय विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकोपूर्व तर महाविदयालयीन विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकोत्तर) नुसार पर्याय निवडावा.
·         आपली आवश्यक माहिती भरावी जसे. जात,प्रवर्ग,महाराष्ट्राचे रहिवासी, अपंगत्व,कौटुंबीक उत्पन्न, इ.
·         पालकाची माहिती, शाळा/महाविदयालयाचा माहिती भरावी.
·         आवश्यक कागदपत्रे अपलोड करुन अभ्यासक्रमाचा तपशील इ. माहिती भरुन Submet बटनवर क्लिक करावे.

         सध्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया mahadbt.gov.in वर चालू असून 5 विभागातील 40 योजनांवरील अर्ज आता ऑनलाईन आहेत. महाराष्ट्र शासनाने जाहिर केल्याप्रमाणे आतापर्यंत 2.83 कोटी (86%) 5 ते 18 वर्षे वयोगटातील नागरीकांची आधार नोंदणी झालेली आहे.

      जर अर्ज भरतांना काही समस्या येत असतील जसे.- मोबाईल आधारशी संलग्न नाही, OTP आधारद्वारे पाठविला परंतु वापरकर्ताद्वारे प्राप्त झालेला नाही किंवा पोर्टलवर बँक खाते आधारशी संलग्न नाही असे दर्शवित असल्यास वापरकर्त्याने खालील लिंक वर संर्पक साधावा.

https://resident.uidai.gov.in/bank-mapper

https://resident.uidai.gov.in/verify-email-mobile

  1. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनां ऑनलाईन करण्यात आलेल्या आहेत त्यांची यादी
  •   भारतसरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती
  •   राज्य शासनाची मॅट्रिकोत्तर शिक्षण फी परीक्षा फी प्रतिपुर्ती योजना
  •   राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती (इ.11वी,12वी )
  •   सैनिक शाळेतील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता
  •   राज्य शासनाची मॅट्रिकपूर्व शिक्षण फी परीक्षा फी प्रतिपुर्ती योजना
  •   अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती
  •   इ. 9 वी व इ.10 वीच्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना केंद्र शासनाची मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती
  •   अनुसूचित जातींच्या मुलींसाठी सावित्रीबाई शिष्यवृत्ती योजना शासन निर्णय
  •   माध्यमिक शाळेतील इ. 5 वी ते 10 तील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
  1. उच्य आणि तंत्र शिक्षण विभागील शिष्यवृत्ती योजनांची यादी

जवाहरलाल नेहरू विद्यापीठ      

  1. प्रस्तावना :- प्रत्येक राज्यासाठी जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, नवी दिल्ली यांच्याकडून सदरच्या शिष्यवृत्तीसाठी संच निर्धारित केले जातात. त्यानुसार शासन निर्णय शिक्षण व सेवायोजन विभाग क्र.एससीएच 1082/151160/[2173]/जनरल-5 दि.07/05/1983 अन्वये महाराष्ट्र राज्यासाठी एक संच निर्धारित केलेला आहे.
  2. दर :- एका विद्यार्थ्यास प्रतिवर्षी रु. 60,000/- शिष्यवृत्ती दिली जाते.
  3. पात्रता :- जवाहरलाल नेहरु विद्यापीठाने त्यांचे कडील विहित नियमानुसार निवड करुन त्या विद्यापीठांत शिकत असलेल्या महाराष्ट्रीय विद्यार्थ्यांमधून एका विद्यार्थ्याची निवड केली जाते.
  4. अंतिम कार्यवाही :- जवाहरलाल नेहरु विद्यापीठाने निवड केल्यानुसार संबंधित विद्यार्थ्यांचा स्वयंपूर्ण प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे सादर करुन त्यास शासनाची मंजुरी मिळल्यानंतर नवीन मंजूरीनंतर तीन वर्ष जवाहरलाल नेहरु विद्यापीठाने [ नवी दिल्ली ] पाठविलेल्या प्रगती अहवालानुसार नूतनीकरण मंजूर केले जाते.
  5. शासन निर्णय 5/02/2004 अन्वये शासनाने शिष्यवृत्ती दरांमध्ये खालीलप्रमाणे बदल करण्यात आलेला आहे.

रु. 5000/- द.म.                                       रु. 8,000/- द.म.+

रु. 5,000/- वार्षिक सादीलवार खर्च                        रु. 10,000/- वार्षिक सादीलवार                                                                    खर्च

  • माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा यामध्ये गुणवत्ता यादीत वरच्या क्रमांकाने स्थान मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी आर्थिक सहाय्ये देण्याची योजना शासन निर्णय
  • तंत्र शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील शासकीय तसेच शासन अनुदानित महाविद्यालयातील व्यासवायिक अभ्यासक्रमात शिकणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी योजना. आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्याकरीता निश्चित करण्यात आलेली 60% गुणाची अट उच्च व तंत्र शिक्षण विभाग चे शासन निर्णय दि.11 ऑगस्ट, 2017 अन्वये शिथील करण्यात आली आहे.
  • अहिंदी भाषिक राज्यातील अहिंदी भाषिक विद्यार्थ्यांना शालांत परीक्षेत्तर अभ्यासक्रमासाठी देण्यात येणारी हिंदी शिष्यवृत्ती शासन निर्णय
  • स्वातंत्र्य सैनिकांच्या तसेच आजी माजी सैनिकांच्या मुले/मुली/ पत्नी/ विध्यवांना शिक्षणाच्या सर्व स्तरावर ( पहिली ते पदव्युतर स्तरापर्यंत ) मोफत शैक्षणिक सवलती योजना शासन निर्णय