पेट्रोल-डिझेल महागाईच्या विरोधात शिवसैनिकांत संताप; स्थानिक गांधी चौकात शिवसेनेने केले उग्र आंदोलन

66

प्रतिनिधी चंद्रपुर

केन्द्र सरकारने केलेल्या पेट्रोल-डिझेल दरवाढीचा व पारीत केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्ली येथे शेतक-यांचे सुरु असलेले आंदोलन पाकिस्तान तसेच चीनचे षडयंत्र असल्याची टिका केन्द्रीय राज्य मंत्री तसेच भाजपाचे नेते रावसाहेब दानवे यांनी नुकतीच केली. या वक्तव्याच्या विरोधात आज महानगर पालिकेच्या समोर गांधी चौकात शिवसेना जिल्हाप्रमुख संदिपभाऊ गिर्हे यांच्या नेतृत्त्वात शेकडो शिवसैनिकांनी रस्त्यांवर उतरत संताप अनावर झाल्याने त्यांनी रावसाहेब दानवेंचा पुतळा भरचौकात तुडवला.

भाजपाचे सरकार कुठलाही गंभीर विषय समोर आला की बुध्दीभेद करतांना दिसून येते. वेगवेगळया विषयांत गुंतवून नागरीकांची दिशाभूल करण्याचे कार्य भाजपाचा केंद्र सरकार करीत आहे. आता तर काळया कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलन करीत असतांना त्यांच्या आंदोलनामागे पाकिस्तान तसेच चिनचे षडयंत्र असल्याचे वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केले असून हे सर्व लज्जास्पद असल्याची टिका जिल्हाप्रमुख संदीपभाऊ गिर्हे यांनी केली आहे. या प्रसंगी शिवसेनेच्या सर्वच पदाधिका-यांनी देशभरात वाढत असलेल्या पेट्रोल तसेच डिजल भाववाढीच्या विरोधात संताप व्यक्त केला.

यानंतर शिवसैनिकांनी रावसाहेब दानवे यांचा पुतळा भरचौकात तुडवला. या प्रसंगी बल्लारपुर विधानसभा उपजिल्हाप्रमुख सिक्की यादव,माजी उपाध्यक्ष जिल्हापरिषद.चंद्रपुर संदीप करपे,चंद्रपुर शहर प्रमुख प्रमोद पाटिल,युवासेना जिल्हाप्रमुख निलेश बेलखेडे,महिला आघाडीचे माजी जिल्हाप्रमुख कुसुम उदार,वर्षा कोठेकर,विद्या ठाकरे,माया पटले युवासेना उपजिल्हाप्रमुख आशिष कावटवार, मुल तालुका प्रमूख नितीन येरोजवार,चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष नरुले,बल्लारपुर तालुका प्रमुख प्रकाश पाठक,राजुरा शिवसेना बबन उरकुडे, चंद्रपुर अक्षय अंबिरवर राहुल विरुटकर,शिवसेना, सुरज नाय्यर स्वप्निल काशीकर,अशोक चिलखरे,श्रीकांत करटभाजने सुपनिलं काशीकर वसीम भाई विक्रांत सहारे राहुल पडघन विनय धोबे वसीम शेख रशीद भाई सोनू ठाकुर,अर्जुन धुन्ना,अक्षय अभिरवार,हर्शल कान्नपेल्लीवार,
ऊर्जानगर बबलू काटरे,शरूख शेख समीर कुरेशी सुमीत अग्रवाल, गडचांदुर प्रणित आहिरकर,घुगूस हेमराज बावने,सुरज घोंगे,रविंद्र ठेंगने, विश्वास मलेकर सद्दाम कानोजे शोभाताई वाघमारे,मंटीताई,चौबेताई,सागर तुरट,नगेश कडू,कमलेश बूगावार,प्रभाकर मूरकुटे,गणेश रासपायले,नितीन राय,विशाल मोडक,राकेश घटे,गिरिश कटारे, व असंख्य शिवसैनिक,महिला आघाडी व युवासैनिक उपस्थित होते

याआधी सुध्दा रावसाहेब दानवे यांनी शेतक-यांना साले अशी शिवी दिली होती. आता पुन्हा शेतक-यांच्या आंदोलनाला गालबोट लावण्याचे काम दानवे करीत आहे. हे सर्व ते मद्य पिऊन करतात काय असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

कुसुम उदार
माजी महिला जिल्हा प्रमुख
शिवसेना चंद्रपुर

रावसाहेब दानवेंना मंत्री पदावरुन निष्कासीत करा

रावसाहेब दानवे हे नेहमीच शेतकरी विरोधी वक्तव्य करीत असतात. मागेही त्यांनी शेतकऱ्यांना साले म्हणून शिवीगाळ केली होती. आता शेतकरी आंदोलना मागे चीन आणि पाकिस्तान आहे असे बेताल वक्तव्य त्यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना जर शेतकाऱ्यांविषयी संवेदना असतील तर त्यांनी त्वरित रावसाहेब दानवे यांना मंत्रीपदावरून निष्कसित करावे व भाजप मधून बाहेरचा रस्ता दाखवावा.

संदीपभाऊ गिर्हे
शिवसेना जिल्हा प्रमुख,चंद्रपुर