स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रियेला सुरुवात.

69

मुंबई: देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनची घोषणा करण्यात आली होती. या काळात त्याचबरोबर त्यांनतर अनेक कर्मचार्यांच्या नोकऱ्यांवर गदा आली आहे. त्यामुळे त्यांना नोकरी टिकवणे महात्वाचे आहे.

त्याचबरोबर लॉकडाऊनमुळे अनेक भरती प्रक्रिया देखील लांबणीवर पडल्या आहेत. मात्र आता हळू हळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. या दरम्यान राज्य तसेच केंद्र सरकारकडून विविध प्रशासकीय पदांसाठी भारती प्रक्रिया परापाडली जात आहे. यासाठी विविध पदांसाठी जाहिराती प्रसिद्ध करण्यात येत आहेत. यामध्ये आता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया कडून स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर ,डेप्युटी मॅनेजर ,स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर, , स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर , स्पेशलिस् कॅडर ऑफिस सिक्युरिटी, स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर सह अन्य पदांच्या भरतीसाठी आज २२ डिसेंबर २०२० पासून अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे. sbi.co.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज सादर करू शकतात.

ऑनलाइन अर्ज करताना पुढील गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. यामध्ये रजिस्ट्रेशन प्रक्रिया तेव्हाच पूर्ण होईल, जेव्हा अखेरची मुदत किंवा त्यापूर्वी ऑनलाइन माध्यमातून शुल्क भरलेले असेल. उमेदवारांनी सर्व आवश्यक ती प्रमाणपत्रे शैक्षणिक अर्हता, अनुभव प्रमाणपत्र आदि अपलोड करावे. प्रमाणपत्र नीट अपलोड न झाल्यास उमेदवारांचा ऑनलाइन अर्ज बाद ठरू शकतो.

डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनशिवाय ही यादी प्रोव्हिजनल असेल, जेव्हा उमेदवार मुलाखतीसाठी जातात तेव्हा सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर करायची असतात. ज्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाते त्यावेळी मूळ प्रमाणपत्रे योग्य नसतील तर उमेदवारांना मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याची परवानगी दिली जात नाही.

यासाठी अर्जदारांना पुढील महत्त्वाच्या तारखांना अनुक्रमे ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरुवात, ऑनलाइन अर्ज अंतिम मुदत आणि शुल्क भरावे लगणार आहेत.

ऑनलाइन अर्जांना सुरूवात होण्याची तारीख – २२ डिसेंबर २०२०

ऑनलाइन अर्ज जमा करण्याची अखेरची मुदत – ११ जानेवारी २०२१

शुल्क भरण्याची अखेरची मुदत – ३१ जानेवारी २०२१