महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी अंतीम तारीख 31 डिसेंबर 2020 शेतक—यांना सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाव्दारे देणार कृषी विभाग

51

महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी अंतीम तारीख 31 डिसेंबर 2020
शेतक—यांना सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाव्दारे देणार कृषी विभाग

मूल(प्रमोद मशाखेत्री) :  शेतक—यांना कृषी विषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी कृषी अधिकारी कार्यालयाची पायपीट करावी लागू नये,सर्व योजनांसाठी एकच अर्ज करता यावा यासाठी शासनाने महाडीबीटी पेार्टल सुरू केले आहे. या पेार्टलवर अर्ज करून 13 हून अधिक कृषी विषयक योजनांचा लाभ शेतक—यांना घेता येणार आहे. यासाठी आतापर्यंत तालुक्यातील 500 शेतक—यांनी महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी केली आहे.

कृषी विभागातंर्गत यांत्रीकरणासह शासनाकडून दिल्या जाणा—या विविध योजनांसाठी शेतक—यांना कृषी विषयक योजनांचे अनुदानाचा लाभ घेण्यासाठी कृषी विभागाकडे अर्ज करावा लागत होता. बरेचदा अर्ज गहाळ सुध्दा होते. मात्र आता महाडीबीटी पेार्टलमुळे शेतक—यांना जवळच्या आपले सेवा केंद्रावर जावून शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर जावून नोंदणी करता येणार आहे. शिवाय आपल्या अर्जावर काय कार्यवाही करण्यात आली हे देखील पाहता येणार आहे.
अर्ज मंजूर झाल्यानंतर शेतक—यांना 15 दिवसाच्या आत साहित्य खरेदी करून त्याचे बिल महाडीबीटी पोर्टलवर अपलोड करावा लागणार आहे. त्यानंतर अनुदान शेतक—याच्या अनुदानावर जमा केले जाईल.

कशी कराल नोंदणी ?
महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी शेतक—यांना जवळच्या आपले सेवा केंद्रावर जावून 24 रूपयांचे शुल्क भरून शासनाच्या संकेंतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे. अर्जासोबत आधारकार्ड, सातबारा,नमनुा आठ,आदी कागदपत्रे आणि मेाबाईल क्रमांक टाकवा लागणार आहे.नोंदणी झाल्यानंतर शेतक—यांना त्यांच्या मोबाईलवर संदेश पाठविला जाणार आहे. यातंर्गत योजनांचा लाभ घेता येईल.

या योजनांसाठी आता एकच अर्ज

कृषी विषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करून कृषी यांत्रिकीकरण ,प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना,मुख्यमंत्री शाश्वत योजना,राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान,एकात्मिक फलोत्पादन योजना,भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना, बिरसा मुंडा कृषी योजना,डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वालंबन योजना,ठिंबक सिंचन योजनेसह इतर योजनांचा लाभ घेता येणार आहे.
अंतीम तारीख 31 डिसेंबर 2020