छायाचित्रकारांनी केले दिनदर्शिकेचे प्रकाशन

80

 

ब्रम्हपुरी  :-
छायाचित्रकार बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर द्वारा ब्रम्हपुरी येथील स्वागत मंगल कार्यालय येथे छायाचित्रकारांच्या दिनदर्शिकेचे सुप्रसिध्द मेंटर तसेच छायाचित्रकार नितीन मेश्रामकर यांच्या हस्ते तसेच संस्थेचे अध्यक्ष नितीन रायपुरे यांच्या अध्यक्षतेखाली प्रकाशन सोहळा पार पडला.
यावेळी मार्गदर्शन करतांना मेंटर नितीन मेश्रामकर (बंटी सर) यांनी या क्षेत्रात वावरासाठी मोठय़ा धावपळीची गरज असते. वेळेचे बंधन पाळावे लागते. मेहनत, प्रसंगावधान हे गुण अंगी बाणवावे लागतात. एखाद्या घटनेची सुरुवात ते अंत यात बराच कालावधी जातो. तो कालावधी पार पाडण्याचा संयम असावा लागतो. छायाचित्रकाराकडे सर्वात महत्त्वाचा गुण असावा लागतो तो जनसंपर्काचा, सुहास्य वदनाचा आणि प्रसंग येईल त्याप्रमाणे स्वत:ला मुरड घालून अ‍ॅडजस्ट करून घेणे. याशिवाय छायाचित्रासाठी योग्य पोज देण्यास समोरच्याला उद्युक्त करता आले पाहिजे. त्यासाठी सकारात्मक वातावरणनिर्मिती करता आली पाहिजे. ज्याच्याकडे निर्मितीक्षमता आहे, ज्याचा दृष्टिकोन विकसित झालेला आहे, ज्याला प्रकाश-संधी प्रकाशाची उत्तम जाण आहे, जो सर्जनशील गोष्टींचा शिस्तबद्ध विचार करू शकतो, ज्याची चित्तवृत्ती निसर्गाशी आणि निसर्गत: उपजलेल्या बाबींशी एकरूप झाली आहे, ज्याला व्यक्तींच्या चेहऱ्याबरोबरच निसर्ग आणि प्राणी-पक्ष्यांच्या चेहऱ्यामोहऱ्यांचे अतोनात वेड आहे, अशी कोणतीही व्यक्ती उत्तम छायाचित्रकार बनू शकते. कदाचित त्याचे तथाकथित औपचारिक शिक्षण प्राथमिक स्तरावरचे असेल किंवा नसेलही. अशा छायाचित्रकारांचे व्यावसायिक आणि हौशी असे दोन प्रकार गणले जातात असे मार्गदर्शन केले.
अध्यक्ष नितीन रायपुरे यांनी उत्तम छायाचित्रकार व्हायचे असेल तर रंगसंगतीची उत्तम जाण हवी तसेच नवनिर्मितीची क्षमता, कलात्मक भान, दृश्यमांडणीची कल्पकता, निरीक्षण शक्ती, आत्मविश्वास, प्रसंगावधान, आवड, जागरूकता ही कौशल्ये जोपासायला हवीत असे प्रतिपादन केले.
सचिव फुलचंद मेश्राम यांनी पूर्वीच्या एकसुरी कौटुंबिक छायाचित्राभोवती घुटमळणारी छायाचित्रणाची संकल्पना आता पूर्णत: बदललेली असून, आता व्यावसायिक छायाचित्रणाबरोबरच पोर्टेचर, फोटो जर्नालिझम, अ‍ॅडव्हर्टायझिंग फोटोग्राफी, फॅशन फोटोग्राफी, इंडस्ट्रिअल फोटोग्राफी, जंगल फोटोग्राफी, फूड फोटोग्राफी, मेडिकल फोटोग्राफी अश्या अनेक फोटोग्राफी शाखांना कमालीचे महत्त्व प्राप्त झाले आहे. आश्चर्य म्हणजे अशा स्पेशलायझेशन फोटोग्राफीमध्ये उत्तम पैसा, समाजमान्यता प्राप्त होत असल्याचे प्रतिपादन केले.
योगायोगाने आजच असलेला ब्रम्हपुरी येथील नीलेश उरकुडकर यांचा वाढ़दिवस सूद्धा याच कार्यक्रम मध्ये केक कापुन साजरा करन्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संस्थेचे विधी सल्लागार एड. खुशाल खोब्रागडे, सचिन वाकडे, योगेश हुड, रवी भगत, रुपेश कोठारे, मनोज राऊत, निलेश उरकुडकर, बंटी येरावार, अमोल मेश्राम, पपिल देशमुख, ज्ञानेश्वर डांगे, नरेंद्र नाकतोडे, राजु तुपट, ज्ञानेश नागोसे, कैलास धोंगडे, कृष्णा ठाकरे, मदन रामटेके, लोकेश देवगडे, प्रमोद नाकतोडे, अभय बांगरे, नितिन चिमुरकर, रोहन राउत, मूलचंद धोटे, सिद्धांत फुलझेले, सुभाष बोदेले, निकेश पानसे, रोशन तरारे, भारत दिघोरे, प्रवीण ठाकरे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन रवी शेंडे तर आभार केशिप पाटील यांनी मानले. यावेळी जिल्ह्यातील छायाचित्रकार मोठ्या संख्येत उपस्थित होते.