नवी दिल्ली – Whatsapp हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम असून मोठ्या प्रमाणात त्याचा वापर केला जातो. मात्र व्हॉट्सअॅपच्या नव्या पॉलिसीमुळे युजर्सची डोकेदुखी वाढली आहे. लोकांनी व्हॉट्सअॅपचा धसका घेतला असून त्याच्यासारखाच दुसरा पर्याय सध्या शोधत आहेत. प्रायव्हसीला धोका नसेल आणि वापरायला ही अगदी सोपं असेल अशा अॅपचा शोध युजर्स घेत आहेत. याच दरम्यान अल्पावधीतच एका अॅपची क्रेझ वाढली आहे. सध्या सिग्नल मेसेंजर (signal massenger) ला जगभरात पसंती मिळत आहे. गेल्या दोन दिवसांत युजर्संची संख्या ही झपाट्याने वाढल्याने सिग्नल मेसेंजरवर व्हेरिफिकेशन कोड उशिराने येत आहे. या अॅपने युजर्संला जोडण्यासाठी एक गाईडलाइन जारी केली आहे.
व्हॉट्सअॅपने बुधवारी युजर्संना पॉपअप मेसेज पाठवला आहे. यामध्ये युजर्संना नियम व अटीसोबत नव्या प्रायव्हसी पॉलिसीबाबत सांगितलं आहे. 8 फेब्रुवारीपासून नवीन नियम लागू होणार आहेत. व्हॉट्सअॅप कशा पद्धतीने तुमचा डेटा यूज करणार आहे. व्हॉट्सअॅपच्या युजसाठी या नियम व अटीला अॅक्सेप्ट करावे लागणार आहे. जर अॅक्सेप्ट केले नाही तर युजर्सचे अकाऊंट डिलीट केले जाईल असं मेसेजमध्ये म्हटलं आहे. व्हॉट्सअॅपच्या या घोषणेनंतर युजर्सची चिंता वाढली आहे. त्यामुळे ते सिग्नल आणि टेलिग्रामसारख्या मेसेजिंग अॅप्सकडे जाण्यासाठी तयार होत आहेत. टेस्लाचे सीईओ आणि जगातील सर्वात श्रीमंत बिझनेसमॅन अॅलन मस्क यांनी गुरुवारी नव्या युजर्सला सिग्नलसोबत जोडण्याचे आवाहन केले आहे.
सिग्नल पर्सनल डेटा मागत नाही तर फक्त तुमचा फोन नंबर स्टोर करतो. सिग्नलने डिसेंबर 2020 मध्ये आपल्या लेटेस्ट व्हर्जनसोबत एक ग्रूप कॉल लाँच केले आहे. सिग्नल पर्सनल डेटा म्हणून फक्त तुमचा फोन नंबर स्टोर करतो. तर टेलिग्राम पर्सनल इन्फॉर्मेशन म्हणून कॉन्टॅक्ट इन्फो, कॉन्टॅक्ट्स आणि युजर आयडी मागतो. गुरुवारी सिग्नलने ट्विट करून अनेक प्रोव्हाइडर्स कडे व्हेरिफिकेशन कोड लेट आले. कारण, नवीन लोक मेसेजिंग अॅप प्लॅटफॉर्मवर जोडण्याचा प्रयत्न करीत होते. कंपनीने एक गाईडलाइन सुद्धा शेअर केली आहे.
सिग्नल जॉइन करायचंय? मग “हे” करा
– सिग्नलवर सर्वात आधी एक ग्रूप (Group) करा.
– ग्रूप सेटिंग्सवर जा आणि ग्रूप लिंकवर (Group link) टॅप करा.
– ग्रूप लिंक क्रिएटसाठी टॉगल (Toggle) ऑन करा आणि शेअरवर टॅप करा.
– यानंतर तुमच्या आवडीच्या जुन्या मेसेंजर अॅपवर शेअर करा.
ग्रूप तयार झाल्यानंतर “हे” करा
– जे लोक या ग्रूपला जोडू इच्छितात ते लिंक शेअर करू शकतात.
– ग्रूपमध्ये नवीन मेंबर्सला अप्रूव्ह करण्यासाठी टॉगल ऑन-ऑफ करा. शेअर लिंकद्वारे नव्या मेंबर्सला यात रिक्वेस्ट येईल.
– नवीन मेंबर्सला अॅड करण्याआधी तुम्हाला ग्रूप अॅडमिनकडून अप्रूव्हल घ्यावे लागेल.
एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.