तुमच्या आयुष्याची स्क्रिप्ट कोण लिहिणार ?

63

तुमच्या आयुष्याची स्क्रिप्ट कोण लिहिणार ?
मूल ( प्रमोद मशाखेत्री ):— आपल्यापैकी प्रत्येकाला आयुष्यात यशस्वी व्हायचे आहे.प्रत्येकाला आपल्या आवडत्या क्षेत्रात नाव बनवायचे आहेत.अनेक जण त्यासाठी पराकोटीची मेहेनत घेतात.पण आपल्याकडे अशी मेहनत घेणारा वर्ग फार लहान आहे.याचे मुख्य कारण म्हणजे अनेक जण स्वत:च्या ध्येयाबदल चर्चा,मनन किंवा प्रगतीचा आलेख न आखता दुस—यांच्या आयुष्यात काय सुरू आहे यामध्ये जास्त रूची ठेवतात. स्वत:च्या आयुष्यात करण्यासारखं काही नसलं की मग दुस—याच्या आयुष्यात डोकावून पाहणे आणि उणिवा काढीत त्याला थोडं फार तिखटमीठ लावत एक रंजक मुदा बनवायचा आणि चार चौघात तो चवीने चघळायचा. आपले नातेवाईक,मित्र —मैत्रिणी,सोबत काम करणारे कर्मचारी,किंवा शेजार धर्म पाळणारे काही सदृहस्थ यामध्ये असू शकतात. महत्वाचा मुदा म्हणजे या सदृहस्थांच्या यादीत आपणही मोडतो किंवा नाही हे तपासून पाहणे आवश्यक आहे.सगळयांच्याच आयुष्यात काही ना काही ध्येय असावे असं एखाद्या भाषणात वगैरे सांगायला बरं वाटतं. अनेक वक्ते तसं संगीतातही पण ख—या खु—या आयुष्यात ते घडणे शक्य नाही. ज्यांना ध्येय गाठायचे आहे.आयुष्यात काहीतरी करायचे आहे त्यांनी आधी रिकामटवळया लोकांपासून आणि त्यांच्या नकारात्मक विचारांपासून दूर राहणे आवश्यक आहे. याचे कारण म्हणजे असे लोक दुस—यालाही नकारात्मक करण्याच्या कलेत पारंगत असतात. अगदी तसेच, जसे हॉलिवूडच्या चित्रपटात एखादा झोंबिचा कळप सामान्य व्यक्तीला झोंबी बनविण्यासाठी आतुरलेला असतो. आयुष्यात काही करायचे असेल तर दुस—यांच्या आयुष्यात काय सुरू आहे याची चर्चा आणि विचार करणे थांबविणे अत्यंत महत्वाचे आहे.
जो पर्यंत आपण स्वत:च्या आयुष्यात काय करायचे आहे याची चर्चा आणि विचार करत नाही तो पर्यंत आपल्या आयुष्याच्या सिनेमा हा अर्धवटच राहील. त्यामुळे दुस—याच्या आयुष्याची स्क्रिप्ट लिहिण्यापेक्षा आपण जर स्वतच्या आयुष्याची स्क्रिप्ट लिहिली तर आपल्या आयुष्याच्या चित्रपटात आपण नक्कीच हीरो बनू यात काही शंका नाही.