MAHA METRO Recruitment 2020: अर्ज करण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

153

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये टेक्निशिअन पदांसाठी भरती करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील तरूणांसाठी सुवर्णसंधी असून आता अर्ज करण्यासाठीही मुदतवाढ देण्यात आली आहे. आता इच्छुक उमेदवारांना ३१ जानेवारीपर्यंत अर्ज करता येईल. ३१ जानेवारी रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत उमेदवारांना अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे. ही पदं नॉन सुपरवायझरी ऑपरेशन आणि मेंटेनन्स पुणे मेट्रो रेल प्रोजेक्टच्या अंतर्गत रेग्युलर बेसिसच्या आधारे भरती केली जाणार आहे. यामध्ये टेक्निशिअन (इलेक्ट्रिकल) साठी २३ पदं, टेक्निशिअन (फिटर), टेक्निशिअन (इलेक्ट्रॉनिक्स) आणि टेक्निशिअन (रेफ्रिजरेशन) या पदासांठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

या पदांसाठी कंम्प्युटर बेस्ड चाचणी घेतली जाणार आहे. त्यानंतर उमेदवारांची वैद्यकीय चाचणीही घेतली जाईल. या पदांसाठी दहावी उत्तीर्ण उमेदवाराकडे एमएससी उत्तीर्ण आणि आयटीआय एनसीव्हीटी आणि एससीव्हीच्या मान्यता प्राप्त संस्थांमधून इलेक्ट्रिकल, फिटर, मेसन सारखी सर्टिफिकेट्स असणं आवश्यक आहे, याव्यतिरिक्त संबंधित उमेदवाराकडे महाराष्ट्राचं डोमिसाईल आणि मराठी भाषा लिहिणं, वाचणं तसंच बोलणं अनिवार्य असेल.

या पदांसाठी १८ ते २५ ही वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. अर्जासाठी खुल्या आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना ४०० रूपये आणि एससी, एसटी आणि महिला उमेदवारांना १५० रुपये नॉन रिफंडेबल शुल्क भरावं लागणार आहे. अधिक माहितीसाठी या ठिकाणी क्लिक करा.

जाहिरात क्र.: MAHA-Metro/P/HR/O &M/06(NS)/2020 & MAHA-Metro/P/HR/O &M/06(S)/2020 

Total: 139 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
Non-Supervisory 
1टेक्निशियन (इलेक्ट्रिकल)23
2टेक्निशियन (फिटर)13
3टेक्निशियन (सिव्हिल)02
4टेक्निशियन (इलेक्ट्रॉनिक्स)13
5टेक्निशियन (AC & Reff.)02
Supervisory 
6स्टेशन कंट्रोलर/ट्रेन ऑपरेटर/ट्रेन कंट्रोलर56
7सेक्शन इंजिनियर (इलेक्ट्रिकल)04
8सेक्शन इंजिनियर  (IT)
01
9सेक्शन इंजिनियर (इलेक्ट्रॉनिक्स)05
10सेक्शन इंजिनियर  (मेकॅनिकल)
01
11ज्युनियर इंजिनियर (इलेक्ट्रिकल)08
12ज्युनियर इंजिनियर (इलेक्ट्रॉनिक्स)03
13ज्युनियर इंजिनियर  (मेकॅनिकल)06
14ज्युनियर इंजिनियर (सिव्हिल)
02
Total139

शैक्षणिक पात्रता:

  • पद क्र.1 ते 5: ITI (इलेक्ट्रिकल वायरमन इलेक्ट्रिशियन/फिटर/मेसन/प्लंबर/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/ मेकॅनिकAC & Reff.)
  • पद क्र.6: इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
  • पद क्र.7 ते 10: इलेक्ट्रिकल/IT/कॉम्पुटर/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी.
  • पद क्र.11 ते 14: इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/मेकॅनिकल/ सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

वयाची अट: 21 जानेवारी 2021 रोजी   [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1 ते 5: 18 ते 25 वर्षे
  2. पद क्र.6 ते 14: 18 ते 28 वर्षे

नोकरी ठिकाण: पुणे

Fee: General/OBC/EWS: ₹400/-   [SC/ST/महिला: ₹150/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जानेवारी 2021   31 जानेवारी 2021

अधिकृत वेबसाईट: पहा

जाहिरात (Notification) & Online अर्ज: