ठिकठिकाणी पार पडला ध्वजारोहणाचा सोहळा

66

ठिकठिकाणी पार पडला ध्वजारोहणाचा सोहळा
मूल
भारतीय प्रजासत्ताक दिनाचा राष्ट्रीय सोहळा आज मूल शहरात उत्साहात साजरा करण्यात आला. प्रशासकीय भवन परीसरात सकाळी ९ वाजुन १५ मिनीटांनी शासकीय कार्यक्रम पार पडला, उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी ध्वजारोहण केले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अनुज तारे आणि तहसिलदार डाँ. रविंद्र होळी उपस्थित होते. यावेळी पोलीस आणि होमगार्ड पथकाने मानवंदना दिली. सकाळी ७.३० वाजता नगर परीषद कार्यालय आणि बाजार चौकात पार पडलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या सार्वजनिक कार्यक्रमात नगराध्यक्ष रत्नमाला भोयर यांनी ध्वजारोहण केले. नव भारत विद्यालय आणि कन्या विद्यालयात संस्थेचे सचिव अँड. अनिल वैरागडे यांनी ध्वजारोहण केले. स्वामी विवेकानंद विद्या मंदीर येथे संस्थाध्यक्षा तथा माजी मंञी श्रीमती शोभाताई फडणवीस यांनी ध्वजारोहण केले. पंचायत समिती येथे सभापती चंदु मारगोनवार, कृषी उत्पन्न बाजार समिती मूल येथे सभापती घनश्याम येनुरकर यांनी ध्वजारोहण केले. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता पार पडलेल्या सर्व कार्यक्रमात कोरोना नियमांचे पालन केल्याचे दिसुन आले.