Aadhaar Card : आता मोबाइल नंबर अपडेट करण्यासाठी कोणत्याही कागदपत्राची गरज नाही; जाणून घ्या

50

Aadhaar card – जर तुम्ही तुमच्या आधार कार्डमध्ये मोबाइल नंबर अपडेट करू इच्छीत असाल तर जास्त विचार करण्याची आवश्यकता नाही. युआयडीएआय ने सांगितल्यानुसार तुम्हाला फक्त तुमचे आधार कार्ड घेऊन आधार केंद्रावर जायचे आहे. यासाठी कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही.

युआयडीएआय ने ट्विट करून सांगितले आहे की, आधारकार्डमध्ये मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही. सोबत केवळ आधार कार्ड घेऊन तुमच्या जवळील आधार केंद्रावर जावे. तुमचा मोबाइल नंबर अपडेट करून दिला जाईल.

आधार कार्डमध्ये मोबाइल नंबर अपडेट करण्याचे फायदे –

आधार कार्ड हे एक महत्वाचे ओळखपत्र आहे. आधार कार्ड बॅंकेसह सर्व ठिकाणी महत्वाचे आहे. आधार कार्ड असल्यास सरकारच्या अनेक योजनांचा लाभ घेता येतो. त्यामुळे आधार कार्डच्या ऑनलाइन सेवेसाठी मोबाइल नंबर अपडेट असणे महत्वाचे आहे.

जर तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने तुमच्या आधार कार्डमध्ये काही बदल करायचे असतील तर त्यासाठी मोबाइल आधार कार्डशी लिंक असणे महत्वाचे आहे.

आधार केंद्रावर कोणत्या सेवा उपलब्ध आहेत ?

नवीन आधार नोंदणी, नाव, पत्ता, मोबाइल नं, इ-मेल आयडी, जन्मतारीख, लिंग अपडेट करणे, बायोमेट्रीक इत्यादी सेवा आधार केंद्रावर उपलब्ध असतात.