सिमेवर पहारा देणाऱ्या सैनिकांचा सत्कार माजी सैनिक महीला भरारी बचत गटाच्या वतीने
स्थानिक कन्नमवार सभागृहाच्या प्रांगणात सत्कार
मूल :— देशाचे रक्षक हे त्या देशाच्या सिमेवर पहार देणारे सैनिक असतात, पहारा देणा-या या सैनिकांमूळेच देशातील जनता सुखाची शांत झोप घेत असतात, जनतेचे सुरक्षा कवच म्हणून काम करणारे सैनिक हे देशाच्या सुरक्षतेसाठी प्राण पणाला लावून रात्रंदिवस सेवारत असतात अश्या सैनिकांप्रती कृतघ्नता बाळगणे ही समाजाची जबाबदारी आहे, या भावनेतून सिमेवर पहारा देवुन अलीकडेच निवृत्त झालेल्या तालुक्यातील सैनिकांचा माजी सैनिक महीला भरारी बचत गटाच्या वतीने स्थानिक कन्नमवार सभागृहाच्या प्रांगणात सत्कार करण्यांत आला. संपन्न झालेल्या कौटुंबिक सोहळयाच्या अध्यक्षस्थानी मूल तालुका माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष एकनाथ गडेकर होते. यावेळी माजी सैनिक बाबा सुर, वासुदेव जंबुलवार, बाबाजी मेश्राम, संतोष खोब्रागडे आदि उपस्थित होते. कार्यक्रमात 9 गार्ड रेजीमेंट मधील निवृत्त हवालदार प्रशांत एकनाथ पाटील, 25 मराठा रेजीमेंन्टचें नायक प्रकाश महाडोळे आणि 103 बाॅंम्बे इंजीनिअर रेजीमेंन्ट मधील नायक प्रकाश झरकर यांनी आपला कार्यकाल पुर्ण करून अलीकडेच निवृत्त होवून स्वगांवी परतले. याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यांत आला. यावेळी सत्कारमूर्ती माजी सैनिकांनी सेवाकाळातील अनुभव सांगतांना सत्काराप्रती कृतघ्नता व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला भरारी बचत गटाच्या अध्यक्षा अंजली सुर यांनी केले. संचालन कविता मोहुर्ले यांनी तर आभार सुनिता खोब्रागडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बचत गटाच्या उपाध्यक्ष पुष्पलता जंबुलवार, वितना खोब्रागडे, मिनाक्षी महाडोळे, रेखा रामटेके, प्रतिक्षा भसारकर, पंचशिाला खोबागडे, नलीनी मेश्राम, रिया जुनीसा शेख, कविता गडेकर आणि उज्वला रंगारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला तालुक्यातील माजी सैनिकांचे कुटूंबिय मोठया संख्येनी उपस्थित होते.