महावितरणकडून बिल वसुलीचा धडाका फुटपाथ वाले ,गोरगरीब धास्तावले :आंदोलन बेदखल

45

महावितरणकडून बिल वसुलीचा धडाका  फुटपाथ वाले ,गोरगरीब धास्तावले :आंदोलन बेदखल

मूल :— कोरोनाच्या भीषण संकटातून गोरगरीब,फुटपाथ वाले नागरीक अद्यापही सावरले नाहीत. असे असताना महावितरणने वीज बिल वसुलीचा सपाटा लावला आहे,दरम्यान,वीज बिल माफीसाठी ​विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी केलेल्या आंदोलनाची महाविकास आघाडी शासनाने दखल न घेतल्याने सर्वसाामान्य विद्युत ग्राहकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
कोरोना विषाणूच्या पाश्र्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाउन करण्यात आले होते.तेव्हापासून मध्यमवर्गीय, व्यापारी,शेतकरी व शेतमजूरांना तसेच कामगारांना उद्योगधंदे ,बंद पडल्याने हातचा रोजगार हिरावला गेल्याने चांगलाच फटका बसला आहे.
अशातच या वर्षी झालेल्या अवकाळी पाऊस व पिकावर आलेल्या निरनिराळया रोगांमूळे सर्वच पिके शेतक—यांच्या हातातून गेली आहेत. हा काळ स्वतची काळजी घेऊन जिवंत राहण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा असतानाच दरम्यानच्या काळात घरगुती वीज ग्राहकांना भरमसाठ वीज बिल पाठवण्यात आले. या विरोधात अनेक राजकीय पक्ष,संघटनांनी रस्तावर उतरून आंदोलने केली.
आघाडी शासनातील ऊर्जामंत्रायांनी कोरोनाच्या काळातील वाढीव वीज बिल माफ करण्याचे आश्वासन दिल्याने अनेक सर्वसामान्य गरीब ,फुटपाथ, नागरिकांनी बिल भरले नव्हते.यामुळे मोठया प्रमाणात विद्युत बिल थकीत झाले. सद्यस्थितीत आर्थिक कारणामुळे विद्युत बिल भरणे अवजड जात आहे. महावितरण हप्त्याची रक्कम पाडुन देऊनही वीज बिल भरण्याचा प्रश्न जैसे थे आहे.
तर शासकीय कामात अडथळा :— महातिवरण कंपनीच्या कर्मचा—यांनी थकीत वीज बिल भरण्यासाठी तगादा लावून वीजपुरवठा खंडित करण्याच्या सुचना संबंधित ग्राहकांना दिला जात आहे. घराचा विजपुरवठा,फुटपाथ दुकानातील विजपुरवठा खंडित हेाण्याच्या भीतीने सर्वसामान्य कुटुंबात आता चांगलीच खळबळ माजली आहे.
दरम्यान,वीज बिल वसुलीसाठी आलेल्या कर्मचा—यांना साधी विचारणादेखील केल्यास शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करण्याचा इशारा देऊन मोकळे होतात.