मूल (प्रतिनिधी)
शासनाने मुल तालुक्यातील घाटाचा लिलाव करून रेती उत्खननाची परवानगी दिली आहे या रेती घाटावरील रेतीचे उत्खनन स्थानिक मजुरांमार्फत करून रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजय सिद्धा वार यांनी केली आहे मुलचे तहसीलदार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे ही मागणी करण्यात आली आहे
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तसेच राज्य शासन ग्रीन टिब्यूनल प्रदूषण नियंत्रण विभागाने वेळोवेळी केलेल्या आदेशानुसार सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर रेतीचे उत्खनन करता येत नाही कंत्राटदार मात्र दिवस-रात्र 24 तास जेसीबी पोकलांड सायाने अवैधरीत्या रेती उत्खनान करून नियमाचे उल्लंघन करीत आहेत या पार्श्वभूमीवर ही रेती स्थानिक मजुरांमार्फत रेतीचा उपसा केल्यास ज्या गावात रेती घाट आहे त्या गावातील गावकरी महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल.
कोरोनाच्या काळात ग्रामीण मजूरांना रोजगाराची अत्यंत आवश्यकता आहे. ही बाब लक्षात लक्षात घेता मूल तालुक्यातील रेती घाटावर मजूरामार्फत रेती उपसा करण्याचे संबधित लिजधारकास आदेश घावे अशी मागणी सिद्धावार यांनी केली आहे.