कृषी पंप विज जोडणी धोरण 2020 योजनेचा ग्राहकांनी फायदा घ्यावा. श्री. चौरसीया, अभियंता महावितरण,मुल.

77

कृषी पंप विज जोडणी धोरण 2020 योजनेचा ग्राहकांनी फायदा घ्यावा.  श्री. चौरसीया, अभियंता महावितरण,मुल.

मूल (प्रकाश चलाख)महावितरण तर्फे शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता व थकबाकीतून मुक्त होण्याकरिता कृषी पंपाचे थकित वीज बिल भरण्याकरिता सुलभ जावे या उद्देशाने कृषी पंप विज जोडणी धोरण 2020 योजना राबविण्यात येत आहे. या योजने अंतर्गत थकीत शेतकऱ्यांनी आपल्या कृषी पंपाचे वीज बिल भरून महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन श्री. चौरसिया, अभियंता यांनी केले आहे.

थकित असलेले वीज बिलापोटी महावितरण कंपनी डबघाईस आली असून निधी उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांचे अनेक पायाभूत सुविधा तसेच नवीन निर्माण होणारे काम करीत असताना निधीअभावी सर्व कामे ठप्प पडली होती. अनेक शेतकरी ग्राहकांकडे त्यांच्या कृषी पंपाचे विज बिल गेल्या कित्येक वर्षापासून थकित होते. राज्यात 42 लाख 60 हजार 431 ग्राहक हे कृषी वर्गवारीतील ग्राहक आहेत. त्यामुळे त्यांचे कडील थकित रकमेचा भरणा हा चिंतेचा विषय बनला होता. कृषी संजीवनी योजना 2015 तसेच मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना 2017 योजनेअंतर्गत शेतकर्यांच्या थकित वीज बिलाचा भार कमी करण्यासाठी अमलात आली होती. परंतु शेतकऱ्यांनी या योजनेला फारसा प्रतिसाद दिला नाही.वसुली नगण्य असल्याने महावितरण कंपनीला निधीअभावी कामे करण्यास अडचण जात होती.

गेल्या कित्येक वर्षापासून थकित कृषी पंप ग्राहक विजेचा भरणा न केल्याने महावितरण कंपनीवर थकित वीज बिलाचा भार पडला होता. यातून मुक्तता करण्याकरिता महावितरणने एक पाऊल पुढे येत व शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता शेतकरी हितासाठी शासनाने शासन निर्णय क्रमांक संकीर्ण :-2020 प्र. क्र. 125/ ऊर्जा- 5 मंत्रालय मुंबई. दिनांक 18/ 12/ 2020 च्या आदेशान्वये “कृषी पंप विज जोडणी धोरण 2020 योजना” अमलात आणली आहे. या योजनेअंतर्गत कृषी ग्राहकांना अर्धी रक्कम भरल्यास त्यांचे कृषी पंपाचे थकीत वीज बिल महावितरण तर्फे पूर्ण माफ करण्यात येत आहे. या योजनेला तालुक्यातील कृषी ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.

या योजनेचा तालुक्यातील 371 कृषी ग्राहकांनी आज पर्यंत या योजनेअंतर्गत आपले पंपाचे थकीत वीज बिल रुपये 24,85,000/-भरून फायदा घेतला आहे. अधिकाधिक कृषी ग्राहकांनी या योजनेचा विनाविलंब फायदा घ्यावा असे आवाहन महावितरण तर्फे करण्यात आले आहे. त्याच प्रमाणे कृषी ग्राहकांनी आपले मोबाईल नंबर दर्ज करून एसएमएस सेवेचा लाभ घ्यावा आणि रिडींग बाबत काही तक्रारी असल्यास मूळ कागदपत्र सहित कार्यालयात उपस्थित होऊन दुरुस्ती करून घ्यावी असेही महावितरण तर्फे आवाहन करण्यात आले आहे.

कृषी पंप विज जोडणी धोरण 2020 अंतर्गत नवीन शेतकरी ग्राहकांना सौर ऊर्जा हा पर्याय देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. कृषी ग्राहकांनी “सौर ऊर्जा” या योजनेअंतर्गत जोडणी करावी व या योजनेचाही फायदा घ्यावा असे महावितरण तर्फे सांगण्यात आले आहे.

“कृषी पंप वीज जोडणी धोरण 2020 अंतर्गत मोजा आकापुर येथील शेतकरी श्री. राजेश आगडे यांनी थकित वीज बिलाचा भरणा केल्याने त्यांना श्री. चौरसिया साहेब, श्री. रणदिवे साहेब महावितरण मुल तर्फे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.”