मुल नगर परिषदेची पाणी पुरवठा योजना महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानामध्ये गैरप्रकार

45

मुल नगर परिषदेची पाणी पुरवठा योजना महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानामध्ये गैरप्रकार

शिवसेना तालुकाप्रमुख नितीन येरोजवार यांची चौकशीची मागणी

मुल  प्रतिनिधी   :-  महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानामधून टंचाईग्रस्त क्षेत्र मुल नगर परिषदेची पाणी पुरवठा योजना 24×7 मंजुरीनंतर कंत्राट प्रकिया पूर्ण झाली. या कंत्राटाचे काम मे.लक्ष्मी सिविल इजि. कंपनी कोल्हापूर यांना मिळाला हि योजना 28 करोड रुपयाची होती यामध्ये 24 तास नागरिकांना मोफत पाणी मिळणार होते परंतु या योजनेचा नगर परिषद अधिकारी तथा पदाधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे योजनेचा बट्याबोढ झाला इतका करोडो निधी खर्च करूनही हि योजना पूर्ण झाली नाही तरी देयक दिले गेले.

योजना पूर्ण झाल्याचा बनाव करण्यात आला योजना पूर्ण झाली तेव्हापासून मुल नगरपरिषद क्षेत्रात 3×7 4×7 सोडला तर दोन तास पण पाणी पुरवटा होत नाही. तसेस नळ जोडणी देताना करोडो रुपये खर्च करून बांधण्यात आलेले सिमेंट रोड फोडण्यात आले. त्या संबंधी या प्रकरणातील गैरप्रकाराची चौकशी करण्याची मागणी मुल शिवसेना तालुकाप्रमुख नितीन येरोजवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर साहेब मुल यांच्या मार्फत निवेदनाद्वारे केली तसेस नगर परिषद अंतर्गत क्षेत्रात पाणी पुरवठ्याची समस्या गंभीर असून जर ती योजनेच्या निकषाप्रमाणे न केल्यास मुल शिवसेना तालुकाप्रमुख नितीन येरोजवार यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे याप्रसंगी उपतालुका प्रमुख सत्यनारायण अमरूदिवार,मधुकर पवार,कपिल येलगेलवार,संदिप निकुरे, राहुल महाजनवार, निखिल भोयर,अरविंद करपे, आशिष गुंडोजवार,श्रीनिवास कन्नुरवार व असंख्य शिवसैनिक हजर होते.