सार्वजनिक ठिकाणी धुलीवंदन सण साजरा करण्यास मनाई

49
सार्वजनिक ठिकाणी धुलीवंदन सण साजरा करण्यास मनाई
होळीदहनासाठी पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमू नये
Ø सॅनीटायझर हातावर लावल्याबरोबर होळीच्या पुजनाकरीता आगीजवळ जाऊ नये
चंद्रपूर, दि. 26 मार्च : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने खबरदारीची उपाययोजना म्हणुन नागरीकांची धुलीवंदन या सण निमीत्य होणारी गर्दी टाळण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्याचे कार्यक्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल्स, रिसोर्ट, शेती, फार्म हाऊस, सार्वजनिक सभागृहे, सार्वजनिक व खाजगी मोकळया जागा, सर्व गृहनिर्माण संस्था, रहिवासी क्षेत्रामधील मोकळया जागा या ठिकाणी दिनांक 29 मार्च 2021 रोजी साजरा होणारा धुलीवंदन हा सण उत्सव साजरा करण्यास मनाई करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी निर्गमित केले आहेत.
तसेच दि. 28 मार्च रोजी साजऱ्या होणाऱ्या होळी सणानिमित्य सार्वजनिक ठिकाणी होळीचे दहन करीत असतांना 5 पेक्षा अधिक व्यक्ती एकावेळी एकत्र येणार नाहीत याची दक्षता घ्यावी. तसेच सदर ठिकाणी नागरीकांनी सामाजिक अंतर राखणे व मास्क वापरणे बंधनकारक राहणार आहे.
होळी दहन स्थळी सॅनीटायझर ठेवले असल्यास सॅनीटायझर हातावर लावल्याबरोबर होळीच्या पुजनाकरीता आगीजवळ न जाता काही काळ आगीपासुन लांब उभे राहावे. शक्यतोवर नागरीकांनी सार्वजनिक ठिकाणी होळीचे दहन करु नये. वृध्द व्यक्ती आणि लहान बालके यांनी सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या होळी दहनाकरिता जाणे टाळावे, असे आवाहन देखीत जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी केले आहे.
आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथरोग कायदा, भारतीय दंड विधान व इतर संबंधीत कायद्यातील तरतुदीअन्वये कारवाई करण्यात येईल असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.