नमस्कार, चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र सध्या बऱ्याच कामासाठी देणे बंधनकारक केले आहे. हा चारित्र्य पडताळणी दाखला शासकीय कामासाठी, खाजगी कामासाठी किंवा इतर कामासाठी देखील लागते. चारित्र्य पडताळणी दाखला मिळवणे पहिल्यांदा ऑफलाइन पद्धतीने फॉर्म भरण्यात येत होते. आणि दाखला देखील ऑफलाइन पद्धतीने मिळत होता. पण सध्या चारित्र्य पडताळणी दाखला मिळवण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागतो आणि दाखला देखील ऑनलाइन पद्धतीने मिळते. मात्र भरपूर जणांना चारित्र पडताळणी दाखला काढणे खूप त्रासदायक होत असते त्याचे मुख्य कारण म्हणजे. चारित्र्य पडताळणी दाखला मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत. त्यासाठी अर्ज कुठे करावा लागतो. त्यासाठी शुल्क किती भरावे लागते. अशा बऱ्याच प्रश्न सर्वसामान्यांच्या मनामध्ये असते. मात्र आपल्याकडे योग्य माहिती असल्यास खूप सोप्या पद्धतीने आपण चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मिळवू शकतो. यासाठी योग्य माहिती घेणे गरजेचे आहे.
चारित्र्य पडताळणी दाखला मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत?
चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मुख्यत्वे ओळखीचा पुरावा, पत्त्याचा पुरावा ,वयाचा पुरावा आणि आपण चारित्र्य पडताळणी जिथे सादर करावयाची आहे. तेथील चारित्र्य पडताळणी मागणीचा पत्र मुख्य कागदपत्रे लागतात.
कागदपत्रांची यादी आपण खालच्या प्रमाणे जोडता येतील.
ओळखीचा पुरावा
1) आधार कार्ड.
2) ड्रायव्हिंग लायसन्स.
3) मतदान कार्ड.
4) पॅन कार्ड.
5) विद्यार्थ्यांची ओळख पत्र
6) पासपोर्ट. आणि इतर.
ओळखीच्या पुराव्यासाठी किमान एक कागदपत्र जोडणे अनिवार्य आहे.
पत्त्याचा पुरावा.
1) रेशन कार्ड.
2) लाईट बिल.
3) फोन बिल.
4) भाडे करार.
5) पासपोर्ट.
6) आधार कार्ड.
पत्त्याच्या पुराव्यासाठी किमान हे कागदपत्र जोडणे अनिवार्य आहे.
वयाचा पुरावा
1) जन्मदाखला.
2) बोर्ड सर्टिफिकेट.
3) शाळा सोडलेला दाखला. आणि इतर.
वयाच्या पुराव्यासाठी किमान एक कागद पत्र जोडणे गरजेचे आहे.
इतर कागदपत्रे.
1) अर्जदाराचे फोटो.
2) अर्जदाराचे सही.
3) कंपनी लेटर.
4) पोलीस अधीक्षक यांना अर्ज.
इतर कागदपत्र मधील फोटो सही आणि कंपनी लेटर किंवा पोलिस अधीक्षक यांना अर्ज जोडणे गरजेचे आहे.
चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज कसे करावे?
चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागतो. त्यासाठी आपले सरकार पोर्टल किंवा चारित्र्य पडताळणी साठी असलेल्या पोर्टल वर जावे. त्या ठिकाणी अर्जदाराचे नोंदणी करून घ्यावे. नोंदणी करताना आपण ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये येतो उदाहरणार्थ शहरी किंवा ग्रामीण असे अचूक निवडून घ्यावे. हे एकदा निवडून फॉर्म सबमिट केल्यास परत परत चूक दुरुस्त करता येत नाही त्यासाठी नोंदणी करताना काळजीपूर्वक नोंदणी करावे.
नोंदणी झाल्यानंतर तयार केलेला युजर आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगिन करून घ्यायचा आहे. लॉगिन झाल्यानंतर सेवेमधून चारित्र्य पडताळणी चा प्रकार निवडून घ्यायचा आहे. यामध्ये तीन प्रकारचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मिळतील. सर्वसामान्य चारित्र्य पडताळणी, सिक्युरिटी गार्ड साठी चरित्र पडताळणी, आणि परदेशात नोकरीसाठी जाण्यासाठी किंवा इतर कारणासाठी जाण्यासाठी चारित्र्य पडताळणी असे तीन प्रकारे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मिळवता येते आपल्याला गरजेचे असेल ते चारित्र्य पडताळणी निवडून आलेला फॉर्म पूर्णपणे भरून घ्यायचा आहे. फॉर्म भरते वेळी वैयक्तिक माहिती, सध्याचा, पत्ता कायमचा पत्ता आणि आपण चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र ज्या कंपनीमध्ये हे किंवा ज्या कार्यालयांमध्ये जमा करायचे आहे. तेथील अधिकाराचे चे हुद्धा त्या कार्यालयाचे किंवा कंपनीचे पत्ता टाकावे. त्यानंतर आपण कुठे कुठे वास्तव्य केले आहे. किती काळ वास्तव्य केले आहे हे. त्याची माहिती भरावी पुढील पानांमध्ये आपल्यावर गुन्हा झाले असल्यास एस किंवा नो करावे हे. आणि आपल्या ओळखीचे आपल्या गावातील दोन व्यक्तीचे नाव पत्ता आणि मोबाईल नंबर भरावा त्यानंतर आपले संबंधित स्थानिक पोलीस स्टेशन निवडून फॉर्म सबमिट करावा. त्यानंतर संबंधित फोटो सही आणि इतर कागदपत्रे जोडावी कागदपत्रे आणि फोटो जोडताना सदर फाइलचे साईज किती ठेवले पाहिजे त्याची पूर्ण माहिती त्याठिकाणी आहे. ते वाचून त्याप्रमाणे त्याची रिसाईज करावे आणि सर्व कागदपत्रे अपलोड करावे. त्यानंतर सेवेसाठी लागणारे शुल्क भरणा करावे शुल्क भरण्यासाठी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग असे पर्याय वापरून पेमेंट करून घ्यावे. त्यानंतर पोच-पावती प्रिंट करावे किंवा आपल्या मोबाईल मध्ये किंवा पीसी मध्ये लॅपटॉप मध्ये हे सेव करून ठेवावे.
चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रास मंजुरी कशी मिळते?
चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज केल्यानंतर सदर अर्ज आपल्या लोकल पोलीस स्टेशन मध्ये ते जाते. त्या ठिकाणी अर्जदाराने भरलेला फॉर्म त्याला जोडलेले कागदपत्रे याची पडताळणी केली जाते. आणि तसेच सदर इसमावर काही गुन्हा दाखल झाले आहेत की नाही याची शहानिशा केली जाते त्यानंतर सदर अर्ज संबंधित पोलीस अधीक्षक कार्यालय किंवा पोलीस आयुक्त यांच्या कार्यालयात जाते. त्यानंतर आपल्या अर्जाची त्या ठिकाणी पुनर पडताळणी होऊन सर्व योग्य असल्यास आपल्या अर्जास मंजुरी मिळते आणि आपल्याला चारित्र्य पडताळणी दाखला मिळते.
चारित्र्य पडताळणी दाखला केव्हा मिळत नाही व का मिळत नाही?
अर्जदाराने चारित्र्य पडताळणी प्रमाण पत्रासाठी ज्यावेळी अर्ज करतात त्यावेळी अर्जामध्ये योग्य माहिती भरावी लागते. फॉर्म भरताना काही चुका झाल्यास किंवा चुकीची कागदपत्रे सोडल्यास अशावेळी चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र हा मिळत नाही.
चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मंजूर झाल्यानंतर कुठे मिळते?
चारित्र्य पडताळणी साठी अर्ज केल्यानंतर सदर अर्ज मंजूर झाल्यानंतर आपण ज्या ठिकाणी अर्ज केला आहे. ते पोर्टल लॉगिन करून घ्यायची आहे. त्यानंतर सदर अर्जाची स्थिती सदर पोर्टल वर दिसेल. आपले अर्ज मंजूर झाले असल्यास त्या ठिकाणाहून आपले दाखला डाऊनलोड करून त्याचे प्रिंट काढू शकतो.