Prdhan Mantri Kisan Sanman Nidhi | प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN)

76

देशातील शेतकरी भरपूर अडचणीना तोंड देत आहेत. त्यात अवेळी पाऊस, कोरडा दुष्काळ, ओला दुष्काळ, गारपीट, चक्रीवादळ अश्या नैसर्गिक संकट किंवा खाते, बियाणे, कीटकनाशक यांचे वाढते दर याउलट शेतकर्‍यांनी बर्‍याच संकटांना तोंड देत काढलेला पीक जेव्हा बाजारात जातो त्याला योग्य भाव न मिळणे. अश्या संकटाने शेतकरी पिळून गेला आहे. पण शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधि ही योजना चालू केल्यामुळे देशातील बर्‍याच सर्व सामान्य शेतकरर्‍याना याचा नक्कीच आर्थिक हातभार लागत आहे. शेतकर्‍याने त्यांच्या किरकोळ गरजा जसे बियाणे, खाते, कीटकनाशके खरेदी करण्यास त्यांना मदत मिळत आहे.

योजनेचे स्वरूप

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ही योजना १००% टक्के केंद्र सरकार पुरस्कृत योजना आहे.

सदर योजनेचे निकष पूर्ण करणार्‍या व्यक्तीस प्रती वर्षी ६०००/- इतका निधि तीन हापत्यामध्ये मिळते.

सदर योजनेअंतर्गत मिळणारे लाभ हे कुटुंबातील पती पत्नी आणि १८ वर्षाखालील आपत्य यांच्या नावे जमीन असल्यास त्या कुटुंबातील एकाच व्यक्तीच्या नावाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधि या योजनेचे लाभ घेण्यास पात्र असेल.

जर १८ वर्षा पेक्षा जास्त वयाच्या आपत्याच्या नावाने जमीन असल्यास सदर योजनेचे निकष पूर्ण करीत असल्यास प्रधानमंत्री किसान सन्मान निधिचे स्वतंत्र लाभ घेण्यास पात्र असेल.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी अपात्र व्यक्ति कोण असेल?

1)     संस्थेच्या नावाने जमीन असल्यास.

2)      संवैधानिक पद धारण केलेले आजी आणि माजी व्यक्ति.

3)      आजी आणि माजी मंत्री.

4)      आजी आणि माजी राज्यमंत्री.

5)      आजी आणि माजी खासदार, राज्यसभा सदस्य,

6)      आजी आणि माजी विधान सभा आणि विधान परिषद सदस्य,

7)      आजी आणि माजी महानगर पालिकेचे महापौर,

8)      आजी आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष.

9)      केंद्र सरकार चे सर्व कार्यरत आणि निवृत कर्मचारी आणि अधिकारी.

10)   शासनाने अंगीकृत केलेली संस्था स्वायत्त संस्थाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी.

11)   स्थानिक स्वराज्य संस्थेतील नियमित अधिकारी आणि कर्मचारी.

12)   मागील वर्षात आयकर भरलेले व्यक्ति.

13)   मासिक निवृत्तीवेतन दहा हजार किंवा त्याहून अधिक घेणारी व्यक्ति.

14)   नोंदणीकृत व्यावसायिक डॉक्टर,

15)   नोंदणीकृत व्यावसायिक वकील,

16)   नोंदणीकृत व्यावसायिक अभियंता,

17)   नोंदणीकृत व्यावसायिक आर्किटेक्ट,

18)   नोंदणीकृत व्यावसायिक चार्टंट अकाऊटंट.

 यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाचा लाभ मिळवण्यासाठी आवशक कागदपत्रे.

1)     आधार कार्ड.

2)      सातबारा उतारा.

3)      बँक पासबुक.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाचा लाभ मिळवण्यासाठी अर्ज कसे करावे?

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेचे लाभ मिळवण्यासाठी तलाठी कार्यालय किंवा आपले सरकार सेवा केंद्र (CSC) किंवा स्वता शेतकरी या योजनेसाठी अर्ज करता येते.

तलाठी कार्यालयात नोंदणी कसे करावे?

शेतकर्‍याने सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गावातील तलाठी कार्यालयात आपले सबंधित कागदपत्रे घेऊन जावे त्याठिकाणी तलाठी यांनी आपले सर्व कागदपत्रे घेऊन आपण या योजनेसाठी पात्र आहात की नाही याची पडताळणी करून आपले फॉर्म भारतात त्यानंतर काही दिवसांनंतर आपले लाभ आपल्या बँक खात्यात जमा होण्यास सुरवात होईल.

आपले सरकार सेवा केंद्रातून योजनेसाठी अर्ज कसा करावा?

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी आपले सरकार सेवा केंद्रातून अर्ज करण्यासाठी आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जावे. आणि आपले सबंधित कागदपत्रे देऊन नोंदणी करून घ्यावे.

शेतकर्‍यांनी स्वतः ऑनलाईन फॉर्म कसे भरावे?

शेतकर्‍यांनी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी च्या पोर्टल वर जाऊन त्यामधून शेतकर्‍यांनी स्वतचे नोंदणी कारावे. नोंदणी करताना प्रथम https://pmkisan.gov.in/ हे वेबसाईट उघडून घ्यावे त्यातून Farmers Corner मधून New Farmer Registration वर क्लिक करून आपले आधार क्रमांक टाकावे त्यानंतर आपल्यासमोर एक फॉर्म उघडेल त्यामध्ये आपले पूर्ण माहिती भरावे आणि नंतर सबमीत करावे.

फॉर्म भरताना चुका झाल्यामुळे लाभ मिळत नसल्यास काय करावे?

फॉर्म भरताना बँक खाते क्रमांक चुकीचे टाकल्यामुळे किंवा फॉर्म भरताना नाव आधार कार्ड वर जसे आहे. तसे न टाकल्याने आपले हफ्ते जमा होत नाही असया वेळेस आपण. तलाठी कार्यालय किंवा आपले सरकार सेवा केंद्र किंवा स्वता शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निदिच्या पोर्टलवर जाऊन दुरुस्त करता येते.

आपले सरकार सेवा केंद्र चालक चुकीचे फॉर्म कसे दुरुस्त करावे?

केंद्र चालकांनी https://pmkisan.gov.in/ पोर्टलवर जाऊन CSC Login वर क्लिक करून आपले CSC ID आणि Password टाकून लॉगिन करून घ्यावे. त्यानंतर Edit Farmer Detail या पर्यायावर क्लिक करून चुकीचे माहिती दुरुस्त करून घ्यावे.

स्वतः शेतकरी ऑनलाईन कसे दुरुस्त करावे?

शेतकरी चुकीचे माहिती दुरुस्त करण्यासाठी https://pmkisan.gov.in/ पोर्टलवर जाऊन Farmers Corner मधून Updation of Self Registration या पर्यायावर क्लिक करून चुकलेले माहिती दुरुस्त करावे.

योजनेचे किती हफ्ते जमा झाले किंवा का जमा झाले नाही याबाबत स्थिती कसे तपासवे?

प्रधानमंत्री किसान सन्मान निधि योजनेचे स्थिति तपासण्यासाठी https://pmkisan.gov.in/ पोर्टलवर जाऊन Beneficiary Status या पर्यायावर क्लिक करून आपले आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक टाकून स्थिति पाहता येते.

धन्यवाद!