कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरीकांनी सहकार्य करावे- प्रशासनाची विनंती

59

मूल (प्रतिनिधी)
कोरोना बाधीतांच्या तपासणीत आज मूल आणि सावली तालुक्यात आकडा कमी झाला असला तरी नागरीकांनी गाफील न राहता सतर्क राहावे. आज झालेल्या आरटीपीसीआर तपासणीत मूल आणि सावली तालुक्यात एकही रूग्ण निष्पन्न झाला नाही परंतु अँटीजन तपासणीत मूल तालुक्यात ९ तर सावली तालुक्यात १२ रूग्न निष्पन्न झाले आहे. मूल तालुक्यात नोंद असलेल्या १३५ कोरोना बाधीतांपैकी ७९ जण गृह अलगीकरणात तर ५६ रूग्ण संस्थात्मक अलगीकरणात उपचार घेत आहेत. सावली तालुक्यात १६६ अँक्टीव्ह रूग्णपैकी ६५ जण गृह विलगीकरणात आणि १०१ जण संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. आज मूल तालुक्यात १११ आरटीपीसीआर तर ५१ जणांनी अँटीजन असे १६२ जणांनी आणि सावली तालुक्यात २४ जणांनी आरटीपीसीआर तर ११५ जणांनी अँटीजन असे एकुण १३९ व्यक्तींनी कोरोनाची तपासणी केली. मूल तालुक्यात आज पर्यंत १३१३६ आणि सावली तालुक्यात १०३५२ जणांनी कोरोनाची तपासणी केली असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.