नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशाचे शिक्षण मंत्री डॉक्टर रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विट करून माहिती दिली आहे की, नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे एप्रिल महिन्यात होणारी जेईई मेन परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने एक पब्लिक नोटीस जारी करून सांगितले आहे की, एनटीई चार सत्रात जेईई (मेन)-2021 आयोजित करत आहे. तिची दोन सत्र झाली आहेत. पहिले सत्र 23 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आले होते, तर दुसरे सत्र 16 मार्च ते 18 मार्चच्या दरम्यान आयोजित करण्यात आले होते. मात्र, आता कोरोना संसर्गाच्या दुसर्या लाटेमुळे निर्माण झालेली गंभीर स्थिती पहाता एप्रिल महिन्यात 27,28 आणि 30 तारखेला होणारे सत्र स्थगित करण्यात आले आहे.