मूल तालुक्यात कोरोना बाधीतांचा आकड्याने गाठली पन्नासी

45

मूल (प्रतिनिधी)
मूल तालुक्यात कोरोना बाधीतांचा आकड्याने अर्धशतक साजरा केला असुन मूल येथील एका जनाचा कोरोनाने मृत्यु झाला आहे. त्यामुळे मूल तालुक्यात मृतकांची संख्या १२ झाली आहे. अँटीजन तपासणीत १७ तर आरटीपीसीआर तपासणीमध्ये ३८ असे एकुण ५३ कोरोनाबाधीत मूल तालुक्यात सापडल्याने स्थानिक प्रशासन चिंतेत सापडले आहे. सावली तालुक्यात आज आरटीपीसीआर तपासणीत १५ जण बाधीत आढळले असुन अँटीजन तपासणीत १३ असे २८ जण बाधीत आढळले आहे. मूल येथील कोरोना चाचणी केंद्रावर ११७ जणांनी आरटीपीसीआर तर ७७ जणांनी अँटीजन असे १९४ जणांनी तपासणी केली असुन मूल तालुक्यात आजपर्यंत १४३५४ जणांनी कोरोनाची तपासणी केली आहे. मूल तालुक्यात असलेल्या २२७ कोरोना अँक्टीव्ह रूग्णापैकी १२४ जण गृह अलगीकरणात तर १०३ जण संस्थात्मक अलगीकरणात आहेत. सावली येथे आज २१ जणांनी आरटीपीसीआर तर १८४ जणांनी अँटीजन असे २०५ जणांनी कोरोना तपासणी केली. सावली तालुक्यात आजपर्यंत १०६३० जणांनी तपासणी केली असुन सावली तालुक्यात कोरोनाच्या १७० अँक्टीव्ह रूग्णांपैकी ७५ जण गृह अलगीकरणात तर ९५ जण संस्थात्मक अलगीकरणात उपचार घेत आहेत. मागील तीन दिवसांपासुन मूल तालुक्यात कोरोना बाधीतांचा आकडा झपाट्याने वाढत असल्याने प्रशासन चिंतेत सापडले असुन बुधवार पासुन जाहीर केलेला जनता कर्फ्यु अधिक कडक ठेवण्याचा विचारात असल्याची माहीती आहे.