खासदार बाळुभाऊ उर्फ सुरेश धानोरकर यांनी मूल येथील दोन्ही कोरोना केअर सेंटर आणि लसीकरण केंद्राला भेटी

88

 

 

मूल तालुक्यात आज सापडले ३२ कोरोनाग्रस्त

मूल (प्रतिनिधी)
तालुक्यात आज झालेल्या आरटीपीसीआर तपासणीमध्ये ३२ जण कोरोना बाधीत सापडले असुन अँटीजन तपासणी मध्ये एकही आढळला नाही. तालुक्यात आज ५२ जणांनी आरटीपीसीआर तर २० जणांनी अँटीजन असे एकुण ७२ जणांनी तपासणी केली. आजपर्यंत तालुक्यात १६४८५ जणांनी कोरोनाची तपासणी केली आहे. मूल तालुक्यात असलेल्या ४९६ कोरोना अँक्टीव्ह रूग्णापैकी ३२२ जण गृह अलगीकरणात तर १७४ जण संस्थात्मक अलगीकरणात आहेत. मूल तालुक्यात आजपर्यंत १३२०१ जणांनी लसीकरणाचा लाभ घेतला असुन आज मूल येथील लसीकरण केंद्र सुरू होते. लसींच्या तुटवळ्यामूळे इतर लसीकरण केंद्र बंद आहे. तालुक्यात निर्माण करण्यात आलेल्या ७५ खाटांच्या उपजिल्हा रूग्णालयातील कोरोना केअर सेंटर मध्ये ५४ तर नवीन माँडेल स्कुल येथील १५० खाटांच्या कोरोना केअर सेंटर मध्ये १०१ असे एकुण १५५ जण उपचारार्थ आहेत. काल पेक्षा आज १५ कोरोनाबाधीत तालुक्यात कमी मिळाले. दरम्यान आज चंद्रपूरचे खासदार बाळुभाऊ उर्फ सुरेश धानोरकर यांनी मूल येथील दोन्ही कोरोना केअर सेंटर आणि लसीकरण केंद्राला भेटी दिल्या.

यावेळी खा. धानोरकर यांनी शाळेतील कोरोना केअर सेंटर मधील स्वच्छते विषयी नाराजी व्यक्त करून कोरोना केअर सेंटर मध्ये स्वच्छता ठेवण्याच्या निर्देशा सोबतचं रूग्णवाहीकेची अडचण दुर करण्याचे आश्वासन दिले. खा. धानोरकर यांच्या भेटीच्या काळात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष घनश्याम येनुरकर आणि राकेश रत्नावार, उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांचेसह स्थानिक अधिकारी वृंद उपस्थित होते.