एक शेतकरी – एक अर्ज : केवळ एकाच अर्जाद्वारे कृषी विभागाच्या विविध योजना

60

एक शेतकरी – एक अर्ज :
केवळ एकाच अर्जाद्वारे कृषी विभागाच्या विविध योजनांमधील सर्व बाबींना अर्ज करण्याची सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. शेतकरी बांधवांनी पोर्टलवरील उपलब्ध बाबींपैकी आपल्या पसंतीच्या बाबी प्रथमतः निवडाव्यात व त्यांचा अर्जात समावेश करावा. आपल्या पसंतीच्या सर्व बाबी निवडून झाल्या नंतरच ‘अर्ज सादर करा’ या बटनवर क्लिक करावे. अशाप्रकारे, आपण निवडलेल्या सर्व बाबींसाठी एकच अर्ज तयार होईल व या बाबींसाठी ज्या-ज्या योजनेतून लाभ देणे शक्य असेल त्या पैकी कोणत्याही एका योजनेतून ऑनलाईन लॉटरीद्वारे लाभ देण्यात येईल.

कृषि विभागाने आता महा-जीबीटी पोर्टलवर “शेतकरीयोजना या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीकरिता सर्व योजनांचा लाम “एकाच अर्णाद्वारे देण्याच्या दृष्टिने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केलेली आहे. या प्रणालीद्वारे शेतकन्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबीच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले असून शेतकऱ्यांनी शेती निगडीत विविध बाबींकरिता अर्ज करावयाचा आहे.मात्र याठिकाणी अर्ज करण्यासाठी किंवा योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपला मोबाईल क्रमांक आधार कार्डशी जोडण आवश्यक आहे.

अर्ज कसा करावा व कोठे करावा :-

अर्ज करण्यासाठी आपण mahadbtmahait.gov.in/ या संकेत स्थळाला अर्ज भेट द्या “शेतकरी योजना” हा पर्याय निवडून अर्ज करा.
हा अर्ज आपण मोबाईल, संगणक/ लॅपटॅाप/ टॅबलेट, तून भरू शकता.
पोर्टलगरील प्राप्त अर्जाची ऑनलाईन लॉटरी, पुर्व संमती देणे,मोका तपासणी तसेच निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट अनुदान वितरण करणे इ. सर्व प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे.
सर्व इच्छुक शेतक-यांनी महा डीबीटी पोर्टलवर नाव नोंदणी करावी.

अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे :-

आधारकार्डशी लिंक असलेला मोबाइल क्रमांक सोबत असावा.
शेतीचा सात बारा उतारा.
आधार कार्ड झेरॉक्स.
बँक पासबुक झेरॉक्स.
अनुसूचित जाती /अनुसूचित जमाती च्या लाभार्थीना जातीचा दाखला.