मुल येथे ‘एक हात मदतीचा’ चा मुल तालुका शिवसेनेचा उपक्रम शिवसेनेच्या 55 व्या वर्धापनदिनानिमित्त्य

55

शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त्य मुल तालुका शिवसेनेच्या वतीने ‘एक हाथ मदतीचा’ या उपक्रमा अंतर्गत विविध समाजपयोगी उपक्रम जिल्हाप्रमुख संदिप गिर्हे यांच्या मार्गदर्शनात मुल शिवसेना तालुकाप्रमुख नितीन दिवाकरराव येरोजवार यांनी राबविले. या प्रसंगी कोविड-१९ बाबत जनजागृती मास्क व सॅनीटायझर चे वाटप करण्यात आले. त्यानंतर कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या विधवांना फॅशन डिझायनिंग प्रशिक्षणाची जबाबदारी घेऊन शिलाई मशिनचे वाटप करण्यात आले. कोरोनामुळे बाधित होऊन मृत्यू झालेल्या कुटुंबप्रमुखाच्या अचानक संकट येऊन ठेपले त्या गरजु कुटुंबातील विधवांना मशिनचे वाटप करण्यात आले त्यामध्ये शिक्षक काॅलनी मधील उदयोन्मुख 30 वर्षीय युवक स्व.जगदिश गुरूनुले यांचे कोरोना मुळे निधन झाले एवघा दिड वर्ष लग्नाला झाले होते तसेच मुल येथील स्व.चंद्रशेखर शं.चिटलोजवार यांचे कोरोनाकाळात निधन झाले त्यांच्या वारसदारांना शिवसेना तालुकाप्रमुख नितीन येरोजवार यांनी शिलाई मशिन देऊन प्रशिक्षणाची जबाबदारी घेऊन महिलांना स्वयंरोजगार देऊन स्वताच्या हिमतीवर उभे राहण्याचे बळ देण्याचे येरोजवार त्यांचेकडून जाहीर करण्यात आले.
सदर उपक्रमांतर्गत गरजु शेतकरीवर्ग यांना बियाणांचे वाटप करण्यात आले.
तसेस शासनाच्या आदेशानुसार विना मास्क व्यक्तीना मुल परिसरात प्रवेश न देण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपुर्वी सतर्क होवून काळजी घेण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आले.
मुल तालुका शिवसेना शेतकरी व शेतमजूर यांच्या मदतीला धावून येत असून तालुकाप्रमुख नितीन दिवाकरराव येरोजवार यांनी सामजिक बांधिलकी जोपासून गरजूंकरीता मदतकार्य सुरु केले आहे.
या उपक्रमादरम्यान नितीन येरोजवार यांनी विविध शासनाच्या कल्याणकारी योजने संदर्भात मार्गदर्शन केले. धानाचे पुंजने जळून नुकसान होणे, बैल मृत्युमुखी पडणे, वीज पडून जीवहानी होणे, जंगली जनावरांच्या हल्ल्यात मृत्यू होणे, अशा घटना घडल्यास त्वरित मुल शिवसेना कार्यालयास संपर्क साधून आर्थिक मदत शासनाकडून मिळवून देऊ असे आवाहनसुद्धा येरोजवार यांनी केले याप्रसंगी उपतालुका प्रमुख रवि शेरकी, सत्यनारायण अमरूदिवार, सुशी दाबगाव सरपंच अनिल सोनुले, सुनिल काळे , राहुल महाजनवार,संदिप निकुरे, निखिल भोयर, अरविंद करपे,शिन्नु कन्नुरवार विनोद काळबांधे हजर होते