उपविभागीय कार्यालय मूल च्या समोर समता परिषदेचे भव्य धरणे आंदोलन

88

मुल – मंडल आयोगाच्या शिफारसी नुसार ओबीसींना शिक्षण,नौकरी, आणि शेतकऱ्यांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी २७ टक्के आरक्षण कायम ठेवून तात्काळ लागू करावे तसेच नीट व मेडिकलच्या विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेमध्ये २७ टक्के आरक्षण देण्याचे निर्देश द्यावे आशा ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी आणि संविधानातील तरतुदीनुसार ओबीसींची जात निहाय जनगणना करून आर्थिक, सामाजिक,राजकीय क्षेत्रात न्याय मिळाला पाहिजे आणि २०१७ पर्यंत सुरू असलेले आरक्षण भाजपच्या केंद्रातील मोदी सरकारणे बेकायदेशीरपणे कपात केली त्यामुळे नीट व मेडिकलच्या ४० हजार ८४२ जागा मोदी सरकारने ओबीसींच्या आरक्षणातून काढून खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देऊन ओबीसींवर अन्याय केला आहे. करिता पूर्वीं प्रमाणे सर्वच क्षेत्रात २७ टक्के आरक्षण दयावे या मागणीसाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा ओबीसींचे राष्ट्रीय नेते मार्गदर्शक, आणि महाराष्ट्राचे मंत्री नाम.छगनराव भुजबळ साहेब यांनी तत्कालीन युपीए सरकारकडे मागणी केली, मोर्चा काढले, आंदोलन केले असता तत्कालीन मानव संसाधन विकास मंत्री स्व.अर्जुन सिंग यांनी दखल घेऊन २७ टक्के आरक्षण सुरु ठेवले होते ते भाजपच्या केंद्र सरकारने बंद केले आहे. ते बंद केलेले आरक्षण मिळविण्यासाठी नाम.छगन राव भुजबळांच्या नेतृत्वात ओबीसींच्या आरक्षणासाठी देशात आंदोलन केले जात आहे. यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जिल्हा चंद्रपूर(पूर्व विभाग) यांच्या वतीने मुल येथील उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फतीने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांना लेखी निवेदन देण्यात आले. निवेदनाच्या प्रति पंतप्रधान नरेंद्र मोदी, खासदार बाळू धानोरकर, यांनाही पाठविण्यात आले आहे. उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देतांना अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष प्रा.विजय लोनबले, महिला कार्याध्यक्ष शशिकला गावतुरे, प्रसिद्धी प्रमुख युवराज चावरे, माळी महासंघाचे विभागीय महासचिव गुरु गुरनुले, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष गंगाधर कुणघडकर, समता परिषद तालुका अध्यक्ष विक्रांत मोहूर्ले, राकेश मोहूर्ले, ओबीसी नेते मंगेश पोटावार, रूमदेव गोहणे, सामाजीक कार्यकर्ता युवा वर्ग निखील वाढई,पनीत पाल,आकाश येसनकर,प्रा.गुलाब मोरे, प्रा,.वसंत ताजने,प्रा.किसन वासाडे, प्रशांत भरतकर, प्रा.प्रभू धोटे, सिनेट सदश सुनील शेरकी, प्रा.राहुल बोधे, धांनजय चुदरी, महेश जेंगठे, किसन खोब्रागडे, पुरुषोत्तम कुणघडकर, प्रवीण लोनबले, विनोद आंबतकर, जितेंद्र बलकी, अमोल नामेवार,विवेक मंदाडे, प्रा. निखिल दहीवले, हेमंत सुपणार, देवराव ढवास, ईश्वर लोनबले,महिला प्रमुख सीमा लोनबले, किरण चौधरी, अर्चना लेनगुरे, अपेक्षा वादाफळे, तनुश्री लेनगुरे, अंजली चौधरी, श्रावणी खोब्रागडे, यांच्यासह असंख्य ओबीसी व समता परिषदेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.