MHT CET 2021: एमएचटी-सीईटीचं व्हायरल वेळापत्रक खोटं, सीईटी परीक्षा सेलकडून स्पष्टीकरण

57

मुंबई: राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेल, सीईटी सेल महाराष्ट्राने MHT CET 2021 परीक्षेच्या तारखेच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण सूचना जारी केली आहे. एमबीए, एमएमएस, एमसीए, ए. आर्च, आणि व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी MHT CET 2021 परीक्षा घेण्यात येते. अभियांत्रिकी आणि कृषी प्रवेशासह सर्व विविध CET साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया आता बंद झाली आहे. परीक्षेची तारीख आणि परीक्षांचे वेळापत्रक अधिकृत वेबसाइट mahacet.org वर अद्याप जाहीर केले गेले नाही. सोशल मीडियावर जारी फिरत असलेलं वेळापत्रक खोटं असल्यांचं राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेलकडून सांगण्यात आलं आहे.

सोशल मीडियावर फिरणारं वेळापत्रक फेक

परीक्षेच्या तारखेच्या संदर्भात, सीईटी सेलने नोटीस जारी केली आहे. परीक्षेचं अद्याप कोणतेही वेळापत्रक जारी केले गेले नाही. सोशल मीडियावरील वेळापत्रक फिरत असलेल्या पोस्ट बनावट असल्याचं राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेलनं म्हटललं आहे. ‘सीईटी परीक्षांचे वेळापत्रक फक्त अधिकृत वेबसाईटवर लवकरच उपलब्ध होईल’, असं सीईटी सेलनं कळवलं आहे. उमेदवारांनी सध्या ऑनलाइन उपलब्ध कथित वेळापत्रक बनावट आहे, याची नोंद घ्यावी, असं सेलनं म्हटलं आहे. MHT CET 2021 परीक्षांच्या परीक्षेची तारीख लवकरच जाहीर केली जाईल आणि mahacet.org वर उपलब्ध होईल.

MHT CET 2021 परीक्षेची तारीख लवकरच जाहीर होणार

उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी 30 ऑगस्ट रोजी सांगितले होते की प्रवेश परीक्षेच्या तारखा ‘पुढील 4 दिवसात ‘ जाहीर केल्या जातील, असं सांगितलं होतं. मात्र, अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.या घोषणेनंतर मात्र MHT CET चे विविध कथित वेळापत्रक सोशल मीडियावर फिरू लागले. सीईटी सेलने हे अहवाल फेटाळले आहेत.

राज्यातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्य सीईटी सेलने आयोजित केलेल्या विविध सीईटीमध्ये जवळपास 10 लाख उमेदवार उपस्थित राहणे अपेक्षित आहे. अधिकृत वेबसाईटवर वेळापत्रक लवकरच ऑनलाइन जाहीर होण्याची शक्यता आहे. अभियांत्रिकी, कृषी, कायदा, एमबीए, आर्किटेक्चर इत्यादी प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या सर्व उमेदवारांना परीक्षेच्या तारखांच्या ताज्या अपडेटसाठी cetcell.mahacet.org ला भेट देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

MHT CET 2021 परीक्षा पॅटर्न

काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र कॉमन एन्ट्रान्स टेस्ट परीक्षेच्या पॅटर्नसह अधिकृत परीक्षा पुस्तिका प्रसिद्ध करण्यात आली होती. महाराष्ट्र राज्य कॉमन एन्ट्रान्स टेस्ट सेलने पीसीएम व पीसीबी या दोन्ही गटांसाठी एमएचटी सीईटी 2021 चा परीक्षेचा पॅटर्न जाहीर केला आहे.

याशिवाय परीक्षेत निगेटीव्ह मार्किंग सिस्टम लागू होणार नाही. परीक्षार्थींनी नोंद घ्यावी की सीईटीची गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राचा पॅटर्न जेईई मेनच्यासारखा असेल. तसंच, जीवशास्त्र विषय असताना परीक्षेचा पॅटर्न नीटसारखा असेल. यासह एमएचटी सीईटी 2021 च्या पेपरमध्ये विचारले जाणारे प्रश्न प्रामुख्याने अॅप्लिकेशन बेस्ड असतील.