आदर्श राजगडचे कार्य प्रेरणादायी:डाॅ.पाखमोडे

120

मूल:- राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या राष्ट्रसंतअध्यासनाचे प्रमुख डाॅ.गुरूप्रसाद पाखमोडे यांनी नुकतीच आदर्श गाव राजगडलासदिच्छा भेट दिली. भेटीदरम्यान त्यांनी आदर्श राजगड येथील वृक्षलागवड,बागबगीचे,सावर्जनिक सभागृह,अंगणवाडी,स्वच्छतागृहे,सौर उर्जेतून गरम पाण्याचीव्यवस्था,विद्याथ्र्यासाठी अभ्यासिका,ग्रामपंचायत विश्रामकक्ष आदी ठिकाणाचीपाहणी करून ग्रामस्थांकडून केल्या गेलेल्या विकास कामांचे मनापासूनकौतुक केले.

 

राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीता ग्रंथानुरूप लोकसहभागतूनकेल्या गेलेल्या आदर्श ग्रामरचनेचा हा एक छोटासा प्रयत्न असल्याचे राजगडचे शिल्पकार चंदू पाटील मारकवार यावेळीम्हणाले.या प्रसंगी ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर,झाडीबोली साहित्य मंडळ मूल शाखेचे अध्यक्ष सुखदेव चैथाले उपस्थित होते.ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने सर्वअतिथींचा शाल व ग्रामगीता देऊन चंदू पाटील मारकवारयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.अध्यासनाचे वतीने राजगड प्रमाणेआदर्श गाव घडविण्याच्या दुष्टीनेनवयुवकांना प्रेरणा देण्याचे तसेच ग्रामीण युवक लघुउद्योग,स्वयंरोजगाराकडे वळावे यादुष्टीने कार्य हाती घेण्यात येईल असे डाॅ.पाखमोडे म्हणाले.