धान उत्पादक शेतकऱ्यांनी बाजार समितीचे आवारातच शेतमाल विक्री करावा मा.घ.म.येनुरकर,सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती,मूल यांचे शेतकऱ्यांना आव्हान

97

दिनांक 15/09/2021 रोजी बाजार समितीचे आवारात किसाण भवन येथे मूल तालूक्यातील शेतकरी बांधवाची सभा आयोजित करण्यांत येऊन शेतकऱ्यांना पिकांसंबंधी व विक्री संबंधाने मार्गदर्शन करण्यांत आले. महाराष्ट्र शासनाचा उपक्रम ई पिक पाहणी ॲप विकसीत करून आपला पेरा आपणच नोंदवायचा असा निर्णय घेण्यांत आला यामागील उद्देश असा आहे की, पिक कर्ज,पिक विमा,हमीभाव केंद्रावर शेतमाल विक्री,शासनाकडील अनुदान ईं.सर्व योजना यामाध्यमातून करण्यांत येणार आहे. त्यामूळे, शेतकऱ्यांनी आपल्या बांधावर जाऊन पिक पाहणी ॲप द्वारे आपल्या शेतातील पिक पेऱ्यांची नोंदनी स्वत:च करावी. याबाबत सविस्तर माहिती सभेत देण्यांत आले. तसेच, बाजार समितीच्या आवारात समितीने शेतकऱ्यांसाठी पायाभुत सोई व सुविधा तयार करण्यांत आले असून ऑक्शन शेड,गोडावून,सिमेंट रस्ते,थंड पिण्यांची पाण्यांची सोय, उपहारगृह ईं.सुविधा आहेत. बाजार समितीत शेतमाल तारण योजना, हमीभाव केंद्र,व उघड पध्दतीने लिलाव यासारखे सुविधा असून ज्या शेतकऱ्यांना जी सुविधा सोईची व शेतमालाला जास्तीत जास्त भाव मिळेल ती पध्दत अमलंबविण्यांत यावी जेणेकरून शेतकऱ्यांला उत्पादीत शेतमालाला चांगला बाजारभाव मिळून शेतकऱ्यांना आर्थीक फायदा होईल.

समितीचे आवारात शेतमाल विक्री केल्यास शेतमालाचा चुकारा हा त्वरीत देण्यांत येऊन योग्य बाजारभाव न मिळाल्यास सदर शेतमाल विक्री करावी किंवा नाही यांची संपूर्ण मुभा शेतकऱ्यांना दिलेली आहे. बाजारपेठेच्या बाहेर शेतमाल विक्री केल्यास बाजारभाव व वजनमापात सुध्दा शेतकऱ्यांची फसवणुक होवून चुकारा मिळेल किंवा नाही यांची शाश्वती सुध्दा राहणार नाही.

तसेच, शासकीय हमीभाव केंद्रावर शेतमाल विक्री करिता ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यांत आलेली असून सदर नोंदणीची मुदत दिनांक 30 सप्टेबर पर्यत आहे. त्यामूळे, नोंदणी करिता सन 2021-22 चा पिक पेरा अद्यावत असणे गरजेचे आहे. नोंदणी करिता 1) 7/12 2)नमुन 8-अ 3) आधारकार्ड 4) बँक पासबुक 5)सामाईक शेती असल्यास संम्मतीपत्र 6) जातीचे स्वंघोषणापत्र किंवा जातीचा दाखला ई.कागदपत्रे समितीत सादर करण्यांत यावे.
आजचे सभेला समितीचे सभापती मा.घनश्याम मधुकरराव येनुरकर व मा.संदिप अ.कारमवार,उपसभापती यांनी मार्गदर्शन केले. सदर सभेतला समितीचे संचालक मा.ध.र.चिंतावार तसेच, तालूक्यातील प्रगतशिल शेतकरी श्री.दशरथ वाकुडकर,श्री.अशोक पुल्लावार,श्री.प्रभाकर सोनुले, श्री.विनोद कामडी, श्री.मनोज महादेव ठाकरे, श्री.पुरूषोत्तम पोरटे, श्री.अनिल नकटू निकेसर, श्री.सुधाकर भाऊजी मुरकुटे, श्री.श्रीकृष्ण संजय बुरांडे, व असंख्य शेतकरी सभेला उपस्थितीत होते.