जिल्हा परिषदेतील बनावट नियुक्ती पत्र प्रकरणी बल्लारपूरतील एका वर गुन्हा दाखल
बेरोजगार युवकांना फसविणारी टोळी सक्रिय असण्याची शक्यता
चंद्रपुरातील जिल्हा परिषदेत नोकरी देण्याच्या नावावर काही युवकांना बनावट नियुक्तीपत्र दिल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर जिल्हा परिषदेतील एकच खळबळ उडाली होती. दरम्यान बुधवारी रामनगर पोलीस ठाण्यात जिल्हा परिषद प्रशासनाकडून तक्रार दाखल केल्यानंतर बल्लारपूरातील ब्रिजेशकुमार वैद्यनाथ झा यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले .जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना फसवणारी टोळी सक्रीय असल्याची शक्यता असून पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे झाले आहे .
जिल्हा परिषदेत कनिष्ठ सहाय्यक व परिचर पदाची कोणतीही पदभरती नसताना तक्तालिन जिल्हाधिकारी आणि तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या संगणीकृत स्वाक्षरी स्कॅन करून काही युवकांना नियुक्तीपत्र देण्यात आले होते . बल्लारपूरतील सरदार पटेल वार्डात राहणाऱ्या आरोपी ब्रिजेशकुमारने काही युवकांना आपल्या जाळ्यात ओढून जिल्हा परिषदेतील नोकरीचे बनावट आदेश माथी मारले .यासाठी प्रत्येक युवकांकडून लाखो रुपयांची रक्कम आरोपीने जमा केली. आदेशाबाबत शंका आल्याने काही युवकांनी जिल्हा परिषद गाठली असता या प्रकरणाची बिंग फुटले. दरम्यान आरोपी ब्रिजेशकुमार सोबत आणखी काहीजण फसवणुकीत सहभागी असल्याची शक्यता असून . पोलिस त्या दिशेने तपास करीत आहेत . नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्यापासून युवक व युवतींनी सावध राहण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मिताली सेठी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे यांनी केले आहे . या प्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल केले असून तपास सुरू असल्याची माहिती रामनगर चे ठाणेदार मधुकर गीते यांनी दिली. असून पोलिसांसमोर बेरोजगार युवकांना घडविणाऱ्या टोळीचा शोध घेण्याचे मोठे आव्हान उभे झाले आहे