शिक्षक भारती तर्फे मूल येथे होणार कोरोना योध्दांचा सत्कार
मूल:- कोरोना काळात शासन निर्देशानुसार अनेक कर्मचा-यांनी कोविड सेंन्टर,सव्र्हेक्षण,विलगीकरण कक्षात सेवा,नाक्यावर सेवा दिली.कोविड काळात सेवा देणा-या कर्मचा-यांचा कोरोना योध्दा पुरस्कार समारंभ मुल येथील पंचायत समिती सभागृहात शिक्षक भारतीतर्फे रविवारी आयोजित करण्यात आला आहे.
समारंभाचे उद्घाटन मूल पंचायत समिती सभापती चंदू मारगोनवार करणार असून शिक्षक भारतीचे विभागीय अध्यक्ष भाऊराव पत्रे अध्यक्षस्थानी राहतील.
प्रमूख अतिथी म्हणून शिक्षक भारती राज्य उपाध्यक्ष राजेंद्र झाडे,गट विकास अधिकारी डाॅ.मयूर कळसे,गटशिक्षणाधिकारी वैभव खांडरे,शिक्षक भारती राज्य संयुक्त कार्यवाह संजय खेडीकर,संघटक सचिव किशोर वरभे,चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष सुरेश डांगे,भास्कर बावनकर,बजरंग जेनेकर,महेश भगत आदी उपस्थित राहणार आहेत.
कोरोना युध्दा पुरस्कार वितरण सोहळयाला उपस्थित राहण्याचे आवाहन शिक्षक भारती चंद्रपूर जिल्हा सरचिटणीस नंदकिशोर शेरकी,मूल तालुका अध्यक्ष क्रिष्णा बावणे,सचिव छबन कन्नाके,कार्याध्यक्ष हिरोजकूमार भोयर,विजय मडावी,कुमदेव कुळमेथे आदीनी केले आहे.