प्रशासनाच्या सुचनांकडे दुर्लक्ष करू नका.- मुख्याधिकारी सिध्दार्थ मेश्राम

92
मूल (प्रतिनिधी)
मुल नगर परिषदेच्या अधिनस्त दुकानदाराकडून रस्त्यावर दुकाने थाटल्या जात असून, तरंगते छतही रस्त्यावर ठेवले जात असल्याची गंभीर दखल नगर परिषदेने घेतली आहे. याबाबत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम यांनी दुकानदारांना जाहीर सूचना देऊन सूचनेचे पालन न केल्यास फौजदारी कारवाई करण्याचा इशारा दिलेला आहे.
काय आहे मुख्याधिकारी मेश्राम यांची सूचना
 
नगर परिषद मुल अंतर्गत बाजार परिसरातील सर्व व्यापारी बंधु भगिनींना याद्वारे सुचित करण्यात येते की, बाजार परिसरात आपल्या दुकानाच्या बाहेर सामान ठेवणे व सार्वजनिक जागेवर तरंगते छत ठेवणे हे नियमबाह्य आहे. याबाबत यापुर्वी सुचना व प्रारंभिक कार्यवाही देखिल झालेली आहे. तथापी पुन्हा सामान बाहेर ठेवणे, तरंगते छत पुन्हा निर्माण करणे या स्वरुपाची जाणिवपुर्वक कृती करीत असल्याचे व प्रशासनाच्या सुचनांकडे दुर्लक्ष करित असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे याबाबत मोठी कार्यवाही प्रस्तावित असुन सदर करण्याकरिता येणारा प्रशासकिय खर्च २००० रु व दंड १००० रु वसुल करण्यात येईल.
आवश्यकतेनुसार फौजदारी गुन्हा देखिल दाखल करण्यात येईल. याची नोंद घ्यावी.
कृपया सहकार्य करावे व कार्यवाही टाळावी.
आपला
सिध्दार्थ मेश्राम
मुख्याधिकारी
नगर परिषद मुल.