पहिल्या मुलीनंतर कुटुंब नियोजन शास्त्रकिया केली तर 50 हजार रूपये

89

माझी कन्या भाग्यश्री योजनेची अंमलबजावणी राज्यभरात होत आहे. या योजनेत पहिल्या किंवा दुसऱ्या मुलीवर शस्त्रक्रिया करणाऱ्या कुटुंबाला ५० हजार रुपयांची मदत दिली जाते. अथवा महिला व बाल कल्याण विभागामार्फत ही योजना राबविण्यात येते. त्यासाठी तालुका जिल्हास्तरावर लाभार्थ्यांना अर्ज करता येतो.

यासाठी १ ऑगस्ट २०१७ नंतर जन्मास आलेल्या आणि पहिल्या किंवा दुसऱ्या मुलीवर शस्त्रक्रिया करणाऱ्या कुटुंबालाच ही मदत दिली जाते. दिलेली मदत बाँड स्वरूपात लाभार्थ्यांना देण्यात येते. यासाठी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र, जन्माचा दाखला आणि इतरही काही बंधनकारक आहे.

वार्षिक उत्पन्न ७.५ लाखांपर्यंत हवे ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न साडेसात लाख रुपये आहे. अशा कुटुंबा योजनेसाठी अर्ज करता येतो. यापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या कुटुंबाला महिला बाल कल्याण विभागाच्या योजनेपासून दूर ठेवण्यात आलेले आहे.

१ ऑगस्ट २०१७ नंतर नवीन नियमाचे पालन करणाऱ्या पालकांसाठीच ही योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे. 

मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार आणे आणि मुलां इतका मुलींचा जन्मदर वाढविणे या उद्देशाने “बेटी बचाओ-बेटी पढाओ” या योजनेच्या धर्तीवरच मुलींचा जन्मदर वाढविणे, त्यांना शिक्षण देणे व बालविवाहास प्रतीबंध करण्यासाठी सध्या सुरु असलेली सुकन्या योजना विलीन करुन व त्याबाबतचा उपरोक्त संदर्भाधिन  शासन निर्णय अधिक्रमित करून “माझी कन्या भाग्यश्री” ही नवीन योजना राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्यानुसार ही योजना संपूर्ण राज्यात सर्व गटातील दारिद्र्य रेषेखालील (BPL) कुटुंबात जन्मणाऱ्या तसेच दारिद्र्य रेषेच्यावरील (APL) पांढरे रेशनकार्ड धारक कुटुंबात जन्मणाऱ्या प्रत्येक मुलीसाठी “सुकन्या” योजनेचे लाभ कायम ठेऊन त्या व्यतिरिक्त मुलीचा जन्म झाल्यापासून मुलगी 18 वर्षे होईपर्यंत खाली दिल्याप्रमाणे अधिकचे लाभ देण्यासाठी या योजनेला शासनाने मंजुरी दिली आहे.