मुल तालुका कृषि कार्यालया तर्फे आयोजन,उद्योजक शेतकरी कार्यशाळा

82

 दि 24ऑगस्ट ला तालुका कृषीअधिकिरी मुल तर्फे प्रधानमंत्रीसुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग
योजनेंतर्गत ताळुक्‍्यातील अल्प,अत्यल्प बेरोजगार, भूमिहिन,वैयक्तिक, समूह गट, बचतगटयांची कार्यशाळा घेण्यात आली.
यात अनेक उद्योजक शेतकरीउपस्थित होते.चालू उद्योगांना गती देणे,तालुक्‍यातील गांवात छोटे छोटेउद्योग करणारे जसे आटा चक्की,मिरची कांडप, पापड, लोंणचे,शेवळ्या, बड्या, चारा पिके,पोहा, मुरमुर मुरघास, मशरूम,मधुमक्षीका मध व्यवसाय, मच्छी
पालन, दुग्धव्यवसाय पनीर, पेढा,खोबा, लोणी, दही, तुप, तयारकरण्यासाठी उद्योग निर्मितीसाठी  65 टक्के किंवा 10 लाखांपर्यंत अनुदान देऊन ग्रामस्तरावर उद्योगनिर्माण करून आर्थिकसक्षमीकरण करणे, हाच उद्देशठेवून केंद्र शासन राज्य शासन
60:40 हिस्सा समावेश आहे.प्रथम साधा अर्ज, आधार, जोडूनऑनलाइन रजिस्ट्रेशन करणे नंतरदुसरा टप्पा, कोटेशन, प्रकल्पतयार करून सादर करणे. यासाठीडिआरपीकडून संपूर्ण प्रक्रियाकरून देतो,या विषयावर ताकृअभास्कर गायकवाड यांनी सविस्तरमार्गदर्शन केले.सुधांशू तिजारेमंकृअ यांनी कार्यप्रणालीसमजावून दिली. टेकाम, प्रफूळमडावी, डीआरपी यांनी मार्गदर्शनकेले. या तालुक्‍यातून विविधउद्योगासाठी 65 अर्ज प्राप्तझालेले आहेत. या कार्यशाळेलाकृषी पर्यवेक्षक, रवी उईके, टीबी
उईके, पराते, राठोड, तसेच सर्वशेतकरी उपस्थित होते.