महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) यांच्यामार्फत 378 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

51
 हाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी मोठी संधी! कारण महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या मार्फत विविध विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांसाठी एकूण 378 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.यामध्ये वनविभाग, कृषी विभाग आदींचा समावेश आहे.

MPSC च्या एकूण 378 पदांसाठी जागामहाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या मार्फत विविध पदांसाठी पात्रधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. यामध्ये खालील पदांचा समावेश आहे : वनक्षेत्रपाल पदांच्या १३ जागा उपसंचालक (कृषी) पदांच्या ४१ जागा तालुका कृषी अधिकारी पदांच्या १०० जागा कृषी अधिकारी (कनिष्ठ व इतर) पदांच्या ६५ जागा सहाय्यक स्थापत्य अभियंता (जलसंपदा) पदांच्या १०२ जागा सहाय्यक अभियंता (विद्युत व यांत्रिकी) पदांच्या ४९ जागाशैक्षणिक पात्रतामहाराष्ट्र लोकसेवा आयोग या भरतीमध्ये विविध पदांसाठी वेगवेगळे शैक्षणिक पात्रता आहे. त्यासाठी पत्रधारक उमेदवारांनी mpsc.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.अर्ज भरण्याची अंतिम तारीखइच्छुक उमेदवार या भरतीसाठी दिनांक 23 ऑक्टोबर 2022 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

जाहिरात क्र.: 087/2022

परीक्षेचे नाव: महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022

Total: 378 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1वनक्षेत्रपाल, गट ब13
2उप संचालक, कृषि व इतर गट-अ49
3तालुका कृषि अधिकारी व इतर, गट-अ100
4कृषि अधिकारी, कनिष्ठ व इतर, गट-ब65
5सहायक अभियंता,स्थापत्य, गट ब, श्रेणी-2  102
6सहायक अभियंता,विद्युत व यांत्रिकी, गट ब, श्रेणी-2  49
Total378

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: विज्ञान शाखेतील पदवी/अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य.
  2. पद क्र.2: कृषि किंवा कृषि अभियांत्रिकी किंवा उद्यानविद्या पदवी किंवा समतुल्य.
  3. पद क्र.3: कृषि किंवा कृषि अभियांत्रिकी किंवा उद्यानविद्या पदवी किंवा समतुल्य.
  4. पद क्र.4: कृषि किंवा कृषि अभियांत्रिकी किंवा उद्यानविद्या पदवी किंवा समतुल्य.
  5. पद क्र.5: स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य.
  6. पद क्र.6: विद्युत/यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य.

वयाची अट: 01 जानेवारी 2023 रोजी, [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: 05 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 21 ते 38 वर्षे.
  2. पद क्र.2, 3 & 4: 18 ते 38 वर्षे.
  3. पद क्र.5 & 6: 19 ते 38 वर्षे.

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.

Fee: खुला प्रवर्ग: ₹394/-  [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: ₹294/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 ऑक्टोबर 2022 (11:59 PM)