मुल सुंदर शहरामध्ये गावठी डुकरांचा हैदोस, न.प. मुल चे दुर्लक्ष

103

जुन्या वार्डातील वार्ड क्रमांक 12  भागातील आसपासच्या परिसरात डुकरांचा अक्षरश: हैदोस आहे. परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे.  डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. आजाराचे प्रमाणही वाढले आहे. यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.या भागात राहणाऱ्या नागरिकांची ही कायमस्वरूपी तक्रार आहे. या भागात नागरिकांना मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित राहावे लागते.

या भागात इलेक्ट्रीक जुनेच खांब आहेत नविन लावलेच नाही,अतिक्रमण रस्ता ,स्वच्छता आदी प्रश्न आहेत. न.प. मुल चे या भागात लक्ष नाही.   दुसरी मोठी समस्या स्वच्छता आहे. या भागात बहुतांश ठिकाणी अस्वच्छता आहे. नागरिकही मोकळ्या भूखंडावर कचरा फेकतात. रस्त्याच्या शेजारी मोकळ्या भागातही कचरा टाकलेला असतो. अशा भागात जनावरांचा हैदोस असतो. कुत्रे, डुक्करे आणि इतर जनावरही या कचऱ्यात लोळतात. त्यामुळे दुर्गंधी पसरते. डुक्करांचा तर मोठा हैदोस या भागात आहे. अनेकदा ते घरांमध्येही घुसतात. लहान मुलांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्यावेळी येथे एक डुक्कर मेलेला होता. दहा दिवस त्याला उचलून नेण्याची तसदी घेण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप पसरला होता.  अशा अनेक समस्यांनी हा परिसर त्रस्त आहे.येथील गावठी डुकराच्या मुक्‍तसंचारामुळे नागरिक धास्तावले आहेत.त्यांच्या फिरण्याने परिसरात घाण वदुगंधी निर्माण होत आहे.काही लोकवराह पालनाचा व्यवसाय करतात,त्यांना बंदिस्त ठेवून त्यांची काळजी करण्यापेक्षा  फिरण्यासाठी पाठविले जाते.उकिरड्यावरील कचरा पसरवून  घाण निर्माण केली जात आहे.वराहमालकांना दम दिला तरीही गावठी  डुक्कर गावात मुक्तपणे फिरताना  दिसत आहेत.