फळबाग लागवड व व्यवस्थापन एक दिवसीय कार्यशाळा…. असोलामेंढा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील मौजे विरई तालुका मूल येथे कार्यक्रम संपन्न….

145

श्री सुमीत सुरेश समर्थ, प्रगतिशील शेतकरी यांचे शेतात सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले होते. सदर कार्यशाळे ला परिसरातील पाणी वापर संस्था अध्यक्ष व सभासद शेतकरी उपस्थित होते. शिवाय तालुका कृषी अधिकारी बी .एम गायकवाड मूल व सावली कृषी अधिकारी वाघमारे साहेब देखील उपस्थित होते. श्रीं सुमित सुरेशजी समर्थ प्रगतिशील शेतकरी यांनी उत्तम प्रकारे मार्गदर्शन व प्रत्यक्ष फळगाब लागवडीसाठी आलेल्या अडचणी ,फायदे व भविष्यातील योजना बाबत माहिती दिली.श्री सुमित सुरेश समर्थ यांनी सव्वा बारा एकरात १००० आंबा (केशरी, दशेरी,लंगडा), ५०० चिकू (कालिपत्ती, क्रिकेटबॉल) , ७०० तैवान पेरू , ५०० निम्बु , २३० नारळ, १००० सीताफळ, ४४० फणस शिवाय त्यांनी प्रायोगिक तत्वावर ड्रॅगन फ्रुट, अंजीर मोसंबी, संत्रा, द्राक्षे, आवळा, गोड चिंच, स्टारफ्रूट, चेरी, स्ट्राबेरी, डाळिंब ईत्यादी फळ पीक घेतले आहेत. सदर फळबागेची लागवड त्यांनी मागील वर्षी जुलै महिन्यात केली असून अल्पावधीतच त्यांनी त्यात जम बसविला आहे. त्यांची फळबाग पाहून आपणाला पश्चिम महाराष्ट्रातील आपण कुठल्यातरी विकसित प्रगत शेती ला भेट दिल्याचाच भास होतो आणि त्यांच्या बोलण्यातून ही ते दिसून येते. कृषी अधिकारी यांनी देखील पारंपरिक शेती व शेती पूरक योजना बाबत माहिती दिली. MSEPP चे श्री गणेश बडे यांनी शेती उत्पन्न आणि प्रक्रिया उद्योग बाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा कार्यकारी अभियंता श्री राजेश सोनोने साहेब यांनी विभागाची भूमिका, जलव्यवस्थापन बाबत मार्गदर्शन केले. तसेच मूल तालुका कृषी अधिकारी गायकवाड साहेब ह्यांनी प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचा दारात कृषी योजना पोहचवून संपूर्ण कृषी विभाग सातत्याने शेतकऱ्याच्या सदैव पाठीशी आहे ! तसेच डॉ गणेश बडे मुंबई विद्यापीठ, पी. जी कांदे प्रशिक्षक मुबई अर्थशात्र व सार्वजनिक धोरण संस्था मुंबई विद्यापीठ ह्यांनि सुद्धा पाणी वापर बाबत शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले ! या अशा प्रकारच्या कार्यशाळेच्या माध्यमातून त्या त्या भागातील शेतकरी यांनी पुढे येऊन नवनवीन प्रयोग करावे.पीक बदल करावा आणि त्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची विभागाची तयारी असल्याची ग्वाही याप्रसंगी मा कार्यकारी अभियंता यांनी दिली.कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता उंदिरवाडे साहेब , सवाणे साहेब , माजी सरपंच अनिल निकेसर ह्यांनी विशेष प्रयत्न केले !
कार्यक्रम यशस्वी होण्याच्या दृष्टीने MSEPP व असोलामेंढा विभाग सावली तसेच प्रगतिशील शेतकरी श्री सुमित सुरेशजी समर्थ यांनी सर्वोतोपरी प्रयत्न केले. सर्वांचे धन्यवाद……..