स्त्रीभ्रूण हत्येवरील “झुरणी” चंद्रपूर जिल्ह्यात प्रथम

84

मूल (प्रतिनिधी)
जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या . यामध्ये मूल पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी सादर केलेली झुरणी ही समाज प्रबोधनपर एकांकिका प्रथम पुरस्काराची मानकरी ठरली .
लक्ष्मण खोब्रागडे यांनी लेखन व दिग्दर्शन केलेल्या या एकांकितेत स्त्रीभ्रूणहत्याचे दुष्परिणाम व उपाय याचा संदेश देण्यासाठी हर्षवर्धन गजभे , के. टी. खोब्रागडे , सुनील ठिकरे आणि सूरज आकनपल्लीवार यांनी साजेशी दमदार भूमिका सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली .
एकांकिकेला प्रथम पुरस्कार मिळाल्याने मूल पंचायत समितीत आनंदाचे वातावरण असून संवर्ग विकास अधिकारी देव घुनावत , सहाय्यक संवर्ग विकास अधिकारी चनफने , कक्ष अधिकारी थामदेव अगडे , गटशिक्षणाधिकारी वैभव खांडरे व सर्व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले .