मूल येथे आंगणवाडी कार्यकर्ती तिन दिवसीय प्रशिक्षण

107

मूल/
बालकाच्या सर्वागीण विकासात आंगणवाडी कार्यकर्ती महत्वाची भुमिका पार पाडत असल्याने त्यांना प्रशिक्षण देण्याची गरज लक्षात घेत पंचायत राज प्रशिक्षण केन्द्र मूल व विस्तार प्रशिक्षण केंद्राच्या सहकार्याने मूल येथे तिन दिवसीय आंगणवाडी कार्यकर्ती प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या. तिन प्रशिक्षण कार्यक्रमात विधि निदेशिका विद्या गेडाम यांनी महिला व बाल सक्षमीकरण, व महिला बालकांचे कायदे तथा संवाद कौशल्य व व्यक्तिमत्व विकास यावर मार्गदर्शन केले. मास्टर ट्रेनर वैशाली कोपुलवार यांनी माता बाल संगोपन , अंगणवाडी सेविकांच्या जबाबदारी, कर्तव्य,भूमिका तसेच कामात नियोजन व आयोजन याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. उपजिल्हा रुग्णालयात मूलच्या. समुपदेशिका ममता शेंडे यांनी माता व बालकांचे खानपान तसेच आजारपण व त्यांवरील उपाययोजना यावर प्रकाश टाकला. उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. मेंडूले यांनी महिलांची आरोग्य तपासणी तसेच मुख ,स्तन, गर्भाशय कर्करोग बाबत माहिती दिली. तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप पंचायत राज प्रशिक्षण केंद्रांचे प्राचार्य अविनाश गरपल्लीवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मूल तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजू गेडाम,विधी निदेशिका विद्या गेडाम आदी प्रामुख्याने उपस्थित होते. या प्रसंगी आंगणवाडी कार्यकर्तीने मनोगत व्यक्त केले.
उपस्थित मान्यवरांनी आंगवाडी कार्यकर्तीना मार्गदर्शन केले. त्यांनतर प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या आंगणवाडी कार्यकर्तीना प्रमाणपत्र देण्यात आले.