कृषी महोत्सवात आधार व आपले सरकार सेवा केंद्र बाबत अधिकृत माहिती..@हजारो शेतकऱ्यांची उपस्थिती.

120

कृषी विभाग आणि पशुसंवर्धन विभागाच्या वतीने चांदा क्लब मैदानात कृषी महोत्सव व पशु प्रदर्शनी, शेतमाल विक्री मेळावा व परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी बैलबंडी चालवत या महोत्सवाची सुरवात केली.यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक भाऊसाहेब ब-हाटे, कृषी उपसंचालक नंदकुमार घोडमारे, नोडल अधिकारी, वरो-याचे उपविभागीय कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे आदींची उपस्थिती होती.

कृषी विभागाच्या वतीने शेतकर्यांसाठी नियमीत कृषी मेळावे आयोजित केल्या जात आहे. यंदाही चांदा क्लब येथे कृषी महोत्सव व पशु प्रदर्शनी, शेतमाल विक्री मेळावा व परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाला आमदार किशोर जोरगेवार यांनी उपस्थिती दर्शवत बैलबंडी चालवत महोत्सवाची सुरवात केली.

स्टाॅल नंबर 0 6 वर आधार व आपले सरकार सेवा केेंन्द्र चंद्रपूर अंतर्गत नागरीकांना देण्यात येणा-या सेवा बदल जनजागृती होण्याच्या दुष्टीने स्टाॅल लावण्यात आलेले आहे. नागरीकांना विविध प्रकारचे बॅनर व प्रम्पलेट नागरीकांना वाटण्यात आले. वयोवृध्दा ,तसेच सामाजीक व राजकीय ,लोकप्रतिनिधीनी आधार बदल माहिती सांगण्यात आली.
शेतकरी बांधवाना, आधार महत्वचा दस्तऐजव आहे प्रत्त्येक शासकीय योजने मध्ये वापर होत असते नागरीकांना सांगण्यात आलेले आहे. दर 10 वर्षाेंनी नागरीकांनी आपले आधार अपडेट जवळच्या केंन्द्रात जावून करावे असं सुध्दा सांगण्यात आले.जिल्हाधिकारी चंद्रपूर महाआयटीचे जिल्हा समन्वयक लालसरे सर ,मंगेश कूरकर सर व आपले सरकारा सेवा केंन्द्र व आधार केंन्द्राचे संचालक उपस्थित होते.