महाडीबीटी शेतकरी योजना वरदान शासनाच्यावतीने @चिरोली येथील राजू मोहूर्ले लाभार्थी

125

कृषी क्षेत्रात होणार आमूलाग्र बदल; कास्तकारांना शेतीपूरक साधनांची उपलब्धता

मूल:- महाराष्ट्र शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना संगणक प्रणालीच्या माध्यमातून अनेक योजनांचा लाभ मिळावा, याकरिता महाडीबीटी पोर्टलची स्थापना करण्यात आली आहे. संगणक प्रणाली सुलभ असल्याने अनेक शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करीत असून शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. त्यामुळे ही योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे.
      या पोर्टलच्या अंतर्गत शेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवित आहे. त्यामुळे आता महाडीबीटी पोर्टलवर ग्रामीण, शहरी शेतकरी योजनांसाठी अर्ज केले जात आहेत. पोर्टलवर एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत लाभ देण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना शेतीपूरक साधने योजनेंतर्गत मिळत असून याचा कृषी उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात वापर होत असून कृषी क्षेत्रात भविष्यात आमुलाग्र बदल तसेच शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यास मदत मिळेल, असा आशावाद शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
       महाराष्ट्र राज्यातील दुष्काळी भागामध्ये शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, त्याचप्रमाणे फलोत्पादन पिकाचे क्षेत्राचा विस्तार व्हावा याकरिता ही योजना 100% अनुदानावर राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली तर त्यांचे पीक जास्त येइल. सोबतच मजुराची चणचण भासत असल्याने यंत्राचा वापर करून शेतकरी आपल्या शेतात अधिक उत्पन्न घेण्यासाठी योजनेंतर्गत साहित्याचा वापर करून उत्पन्न घेईल. विविध प्रकारच्या शेतकरी योजना राबविण्यात येत असल्यामुळे खऱ्या अर्थाने शेतकरी आज चांगल्या पद्धतीने शेती करू शकणार आहे. शेतकरी योजनांतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अर्ज करावा, आणि दिलेला लक्षांक पूर्ण व्हावा, हा शासनाचा या शेतकरी योजना राबविण्यात मागचा उद्देश आहे.

दोन वर्षांपूर्वी शेतकरी योजनेसाठी महाडीबीटी पोर्टलवर पाइप या घटकासाठी अर्ज करण्यात आला होता. परंतु अजूनपर्यंत योजनेंतर्गत मला लाभ मिळालेला नाही.
रामदास भुरसे, शेतकरी, हळदी

इलेक्ट्रक मोटर पंप या घटकासाठी योजनेंतर्गत अर्ज सादर करण्यात आला. निवड प्रक्रियेत निवड करण्यात आल्यानंतर मला शासनाकडून अनुदानावर इलेक्ट्रक विद्युत पंप देण्यात आले. मोटर पंपाचा शेतात वापर करून भाजीपाला लागवड करीत आहे.   —-  राजेश्वर महाडोरे शेतकरी, मूल

मि महाडीबीटी योजने मधून आॅनलाई न अर्ज केलो असता 1 महिन्या मध्ये टॅक्टर लागल्यामुळे मला शेती करण्यास फायदा होईल शासनाच्या योजनेचा लाभ मिळत आहे. राजू वाढई टॅक्टर लाभार्थी

योजनेत पारदर्शकता
योजनेत ‘अर्ज एक योजना अनेक असल्याने शेतकरी अनेक योजनांसाठी अर्ज सादर करीत असतो. निवड प्रक्रिया ही संपूर्ण संगणकीय असल्याने अनेक शेतकऱ्यांना कधी कधी लाभ मिळत नसतो. त्यामुळे या प्रक्रियेत पारदर्शकता आणावी, अशी तालुक्यातील शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.