मूल तालुक्यातील बोंडाळा बुज. येथील शेतकरी अनिल महेंद्र मिश्रा यांना कृषी अभियांत्रिकी योजना २०२२-२०२३अंतर्गत मंजूर ट्र्याक्टर चे हस्तांतरण मूल येथील तालुका कृषी अधिकारी गायकवाड यांनी शुक्रवारी दिनांक १०/०३/२०२३ रोजी नगरपालिका कार्यालयासमोर गुजरी चौकात मूल तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजू गेडाम व पत्रकार दीपक देशपांडे व अन्य कृषी विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत केले.
संपत आलेल्या २०२२-२०२३या वर्षात मूल तालुका कृषी विभागाच्या वतीने विक्रमी कृषी साहित्याचे वाटप केले असल्याचे गायकवाड यांनी याप्रसंगी सांगितले.
आनलाईन नोंदणी करुन मागणी केली गेल्याने शेतकऱ्यांना या साहित्य आणि अवजारांचे वाटप व लाभ अतीशिघ्रतेने मिळू लागला असून तालुक्यातील शेतकऱ्यांनी या विविध योजना कृषी अधिकाऱ्यांकडून समजून घेऊन त्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी गायकवाड यांनी समस्त शेतकऱ्यांना केले आहे.
शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसाय वाढिसाठी विविध योजनांचा फायदा मिळावा यासाठी कृषीविभाग आणि तेथील कर्मचारी वर्ग शेतकऱ्यांशी संपर्क साधून शासनाच्या विविध योजनांची माहिती देत त्या मिळवण्यासाठी आवश्यक ती सगळी मदत करत असल्याने शेतकरी वर्ग पुढे येऊन या योजनांचा लाभ घेत आहेत. परिणामी मजुरांच्या कमतरतेतही शेतीपयोगी कार्य अधिक वेगाने होताना दिसत आहेत.
अनुदानावर घेण्यासाठी अर्ज सुरु झालेले आहेत. याचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा
विभागाचे नाव
कृषी विभाग
सारांश
- कृषि यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे व शेती मधील उर्जेच्या वापराचे प्रमाण २ किलोवॅट/ हेक्टर पर्यंत वाढविणे.
उद्देश :
- जेथे शेतीमधील उर्जेचा वापर कमी आहे अशा क्षेत्रामध्ये व अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांपर्यंत कृषि यांत्रिकीकरणाचा लाभ पोहोचविणे.
- प्रात्याक्षिके व मनुष्यबळ विकासाद्वारे सहभागीदारमध्ये जागरुकता निर्माण करणे.
धोरण :
- कृषि यंत्र/ अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देणे प्रशिक्षण व प्रात्यक्षिका द्वारे सहभागीदारांना कृषि यांत्रिकीकरणास प्रोत्साहित करणे
अनुदान
- या योजनेतून खालील दिलेल्या कृषि यंत्र / अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्यात येईल:
- १) ट्रॅक्टर
- २) पॉवर टिलर
- ३) ट्रॅक्टर/ पॉवर टिलर चलित अवजारे
- ४) बैल चलित यंत्र/अवजारे
- ५) मनुष्य चलित यंत्र/अवजारे
- ६) प्रक्रिया संच
- ७) काढणी पश्च्यात तंत्रज्ञान
- ८) फलोत्पादन यंत्र/अवजारे
- ९) वैशिष्ट्यपूर्ण यंत्र अवजारे
- १०) स्वयं चलित यंत्रे
- भाडे तत्वावरील सुविधा केंद्र:
- १) कृषि अवजारे बँकेची स्थापना
- २) उच्च तंत्रज्ञान , उत्पादन सेवा सुविधा केंद्राची स्थापना
- *लाभाच्या माहितीसाठी कृपया सोबतचे प्रपत्र पाहावे.
View Benefits
पात्रता
- शेतकऱ्याचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे
- शेतकऱ्याकडे ७/१२ उतारा व ८ अ असावा
- शेतकरी अनु. जाती , अनु.जमाती मधील असल्यास जातीचा दाखला आवश्यक
- फक्त एकाच औजारासाठी अनुदान देय राहील म्हणजेच ट्रॅक्टर किंवा यंत्र/ अवजार
- कुटुंबातील व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर असल्यास , ट्रॅक्टरचलित औजारासाठी लाभ मिळण्यास पात्र असेल परंतु ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक
- एखाद्या घटकासाठी / औजारासाठी लाभ घेतला असल्यास त्याच घटक/ औजारासाठी पुढील १० वर्षे अर्ज करता येणार नाही परंतु इतर औजारासाठी अर्ज करता येईल
उदा. एखाद्या शेतकऱ्याला सन २०१८-१९ मध्ये ट्रॅक्टरसाठी लाभ देण्यात आला असेल तर पुढील १० वर्षे ट्रॅक्टरसाठी लाभ मिळण्यास पात्र ठरणार नाही सन २०१९-२० मध्ये इतर औजारासाठी लाभापात्र राहील
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- ७/१२ उतारा
- ८ अ दाखला
- खरेदी करावयाच्या अवजाराचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल
- जातीचा दाखला ( अनु. जाती व अनु. जमाती साठी )
- स्वयं घोषणापत्र
- पूर्वसंमती पत्र