50 हजार प्रोत्साहन अनुदान 4 थी यादी जाहीर@CSC या ठिकाणी जाऊन आपले आधार प्रमाणीकरण करणे गरजेचे

190

काही दिवसापूर्वी ५०००० रु प्रोत्साहन अनुदानाची काही जिल्ह्यामध्ये ३ री
तर काही जिल्ह्यामध्ये चौथी यादी जाहीर झाली होती.३ री यादी मागील काही
दिवसापूर्वी जाहीर झाली होती, आता ५० हजार रु प्रोत्साहनपर अनुदानाची ४
थी यादी जाहीर झालेली आहे.
महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत प्रोत्साहन पर
लाभ योजनेची ४ थी यादी जाहीर मंगळावर दि. १४ मार्च २०२३ रोजी
पोर्टल वरती अपलोड करण्यात आली आहे.
या ठिकाणी आपल्या जिल्ह्याची यादी उपलब्ध नसल्यास आपण जवळील आपले सरकार
सेवा केंद्र, ऑनलाईन सुविधा केंद्र याठिकाणी जाऊन आपले नाव यादी आहे का?
चे करू शकता.
ज्या शेतकऱ्याचे प्रोत्साहनपर अनुदान योजनेमध्ये नाव असेल तर अशा
शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्र, महा ई सेवा केंद्र, ऑनलाईन सुविधा
केंद्र, CSC या ठिकाणी जाऊन आपले आधार प्रमाणीकरण करणे गरजेचे आहे. आधार
प्रमाणीकरण केले तरच ५० हजार प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळणार आहे.