मूल येथे ‘पोस्को’अंतर्गत गुन्हा दाखल

137

40 वर्षाचा युवकाने केला सात वर्षीय बालिकेचा विनयभंग पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल. पंचशील नगर वार्ड क्रमांक 7 मधील अंगावर काटा आणणारी घटना. बालिका ही घराबाहेर खेळत असताना आरोपी किशोर गेडाम बालिकेला तुला काहीतरी देतो असे आमिष दाखवत स्वतःच्या घराच्या दिशेने घेऊन गेला. स्वतःच्याच घरी बालिकेवर अतिप्रसंग करत असल्याचे एका युवकाच्या निदर्शनात आले. त्या युवकाने आजूबाजूच्या लोकांना बोलवले असता आरोपी आणि बालिका निवास्रावस्थेत आढळून आले. आजूबाजूच्या लोकांनी आरोपीला मारहाण करत मूल पोलीस स्टेशन येथे नेले. आरोपीवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मुल पोलिस करत आहेत.पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली.