‘आशा’ दिनानिमित्त आरोग्याच्या रणरागिणीचा गौरव

102
चंद्रपूर, दि. 20 : आशा दिनाचे औचित्य साधून चंद्रपूरच्या तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या वतीने 18 व 19 मार्च 2023 रोजी कर्मवीर दादासाहेब कन्नमवार सभागृह, जिल्हा परिषद, चंद्रपूर येथे आरोग्याच्या रणरागिणीचा गौरव व विविध कार्यक्रम घेण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. प्रकाश साठे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. प्राची नेहूलकर, कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. पराग जीवतोडे, विमलादेवी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज वांढरी संचालक डॉ. अंकिता सिंग, जिल्हा समूह संघटक (आशा) शितल राजापूर चामोर्शी नवसंजीवनी नर्सिंग कॉलेजचे संचालक श्री. गोवर्धन, वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित जयस्वाल आदी उपस्थित होते.
यावेळी वर्षभर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशा स्वयंसेविका, आशा गटप्रवर्तक यांचा प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमात आशा स्वयंसेविका, आशा गटप्रवर्तक यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. कार्यक्रमात गीतगायन, नृत्य, पथनाट्य, रांगोळी, पाककला, संगीत खुर्ची, फॅन्सी ड्रेस असे विविध कलाकृती आशा स्वयंसेविका, आशा गटप्रवर्तक यांनी सादर केली. यावेळी सर्व विजयी आशा स्वयंसेविका, आशा गटप्रवर्तक, यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शृंगारे यांनी तर संचालन विस्तार अधिकारी मुर्लीधर नन्नावरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका समूह संघटक (आशा), श्री. राठोड, जयांजली मेश्राम, संदीप मुन, गायत्री निखाडे तसेच कार्यालयातील इतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले. जिल्हा प्रशिक्षण केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रीती राजगोपाल यांनी आशा दिवस कार्यक्रमाला भेट देत सहभाग नोंदविला. तालुक्यातील आशा स्वयंसेविका, आशा गटप्रवर्तक, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक स्री-पुरुष, आरोग्य सेविका, स्टॉफ नर्स व तालुका आरोग्य कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.