आपले आधार कार्ड हरवले असेल तर विशिष्ट प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ते आपल्याला पुन्हा मिळू शकते.

86

 

आधार कार्ड संबंधातील कोणत्याही तक्रारी दूर करण्याकरिताwww.uidai.gov.in या संकेतस्थळावर दाद मागण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

संकेतस्थळावरून ई नंबर डाउनलोड करून आपल्याला यासंदर्भातील तक्रारी कळवता येऊ शकतात.

त्याकरिता आपला रजिस्टर मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी अशी माहिती द्यावी लागते. ही माहिती दिल्यानंतर आपल्याला ई-आधार मिळते. यावरून आपण एन्रोलमेंट क्रमांकही डाउनलोड करू शकतो. आधार कार्ड तयार करण्यापूर्वी या कार्डची एन्रोलमेंट प्रक्रिया सुरू केली जाते. यानुसार एका विशिष्ट केंद्रावर नागरिकांची बायोमेट्रिक आणि अन्य माहिती एकत्रित केली जाते.

असे केल्यानंतर नागरिकांना एक पावती दिली जाते. यालाच एन्रोलमेंट पावती म्हणतात. या क्रमांकाच्या आधारे आपण आपले कार्ड सध्या कोणत्या स्थितीत आहे याची माहिती मिळवू शकतो. ही सुविधा संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ज्यांचे आधार कार्ड हरवले आहे ते आपल्या कार्ड नंबरच्या साहाय्याने डुप्लिकेट कार्ड मिळवू शकतात. या संकेतस्थळाच्या मुख्य पानावर आधार कार्डच्या मोनोग्राम खाली सिलेक्ट हा पर्याय आपल्याला मिळतो.

या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अनेक पर्याय संगणकाच्या स्क्रिनवर दिसू लागतात. त्यातील रेसिडंट पोर्टल या पर्यायावर क्लिक करा. क्लिक केल्यावर ईआयडी/युआयडी असे दोन पर्याय समोर येतात. रेसिडेंटवर क्लिक केल्यावर नवीन पान उघडले जाते.

या पानावर आधार कार्ड या पर्यायाकरिता महिलेचे चित्र दिसेल. त्या चित्राखाली ईआयडी/युआयडी हे पर्याय दिसतील. जर तुमची एन्रोलमेंट स्लीप हरवली असेल तर ईआयडीवर क्लिक करा. आधार कार्ड हरवले असेल तर युआयडी या पर्यायावर क्लिक करा. असे केल्यानंतर एक फॉर्म आपल्याला दिसू लागतो. या फॉर्ममध्ये आपले नाव, एन्रोलमेंट करताना दिलेला मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी ही माहिती भरावी लागते. ही माहिती भरल्यानंतर चार आकडी सिक्युरिटी कोड दिसू लागतो. तो क्रमांक आपल्याला सादर करावा लागतो. असे केल्यानंतर स्क्रिनवर गेट ओटीपी (वन टाईम पासवर्ड) दिसू लागतो.

त्यावर क्लिक केल्यानंतर थोड्याच वेळात आपल्या मोबाईलवर वन टाईम पासवर्ड दिला जातो. हा पासवर्ड सादर केल्यानंतर मोबाईलवरच ईआयडी अथवा युआयडी क्रमांक कळवला जातो. आधार कार्डकरिता तुम्हाला देण्यात आलेल्या युआयडी क्रमांकांच्या माध्यमातून युआयडीएआय पोर्टलवर जाऊन ई-आधार डाउनलोड करता येते.

आधार कार्ड कोणत्या स्थितीत आहे हे माहिती करून घेण्यासाठी https://eaadhaar.uidai.gov.in/ अथवा https://portal.uidai.gov.in/uidwebportal/enrolmentStatusShow.do या लिंकवर क्लिक करावे लागते. त्यावरून आपले आधार कार्ड तयार झाले आहे की पाठवले गेले आहे अथवा अजून तयार व्हायचे आहे याबाबतची माहिती मिळू शकते.