सामाजिक दायित्व निभावले @मूल तथा ग्रामीण विभागातील रुग्नाना जीवन रक्षकप्रणाली ( वेंटीलेटर ) समर्पित

225

आपण प्रत्येक जण समाजाचे काही तरी देणं लागतो. म्हणूनच सामाजिक दायित्वाचे भान ठेवत 
सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. म्हणूनच आज

” रुग्ण सेवा हिच इश्वर सेवा”
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मूल तथा ग्रामीण विभागातील रुग्नाना जीवन रक्षकप्रणाली ( वेंटीलेटर ) समर्पित

मूल येथील प्रसिद्ध राईस मील उद्योजक हिरेन गोगरी (शहा ) यांच्या सुविद्य पत्नी हिना हिरेन गोगरी हिचे ३ फेब्रुवारी ला आकस्मिक निधन झाले . दिर्घ कालीन उपचार करत असताना पती हिरेन यांनी दवाखान्यात अंत्यत नाजूक अत्यावश्यक वेळी वेंटीलेटर ची आवश्यकता आणि त्यासोबत आवश्यक सेवा जीवन वाचविण्यासाठी किती मोलाचे ठरू शकते हे जवळून पाहले अनुभवले . सर्व सामान्य जनता , रुग्ण यांना आपातकालीन वेळी हे महागडी उपकरण दवाखान्यात उपलब्ध नसतात व त्याचा खर्च ही सोसू शकत नाही .
    आपले सामाजीक दायित्व व कर्तव्य याची जाणीव ठेवून मूल येथील ग्रामीण रुग्णालयात सर्व जनतेच्या / रुग्णाच्या सेवेत हिरेन गोगरी यांचेकडून पत्नी हिना गोगरी हिचे स्मृती प्रित्यर्थ मूल ग्रामीण रुग्णालय येथे संपूर्ण ICU यूनीट सर्व अत्यावश्यक / जीवनावश्यक यंत्र सामग्री सह समर्पित केले आहे ज्यामुळे हार्ट अटॅक किंवा इतर गंभीर आजार वेळी जीव वाचविणे सोपे जाईल व उपचार करण्यास वेळ मिळेल
हा ICU यूनीट समर्पण कार्यक्रम आज बुधवार सकाळी १०:३० वाजता पार पडला आहे