महाज्योती फ्री टॅब योजना सुरू@१० एप्रिलपर्यंत करा अर्ज

895

फ्री टॅबसाठी १० एप्रिलपर्यंत करा अर्ज
चंद्रपूर : दहाव्या वर्गाची परीक्षादेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र
शासनातर्फे महाज्योती फ्री टॅब योजना सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी महाज्योती फ्री टॅब योजनेचा लाभघेण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने १० एप्रिलपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Application for MHT-CET/JEE/NEET – 2025 Training

महाज्योती तर्फे JEE/NEET/MHT-CET 2025 परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याना टॅब व प्रशिक्षण देण्याकरिता नोंदणी अर्ज मागविण्यात येत आहेत. परंतु अर्ज करताना काही विद्यार्थ्यांजवळ नॉन क्रिमीलेअर, जात प्रमाणपत्र व रहिवासी दाखला नसल्यामुळे अर्ज भरतांना अडचणी येत आहेत असे काही विद्यार्थ्यांनी महाज्योतीला कळविले आहे. त्या करिता विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की दहावीची गुणपत्रिका ज्यावेळेस मागविण्यात येईल तेव्हा विद्यार्थ्यांनी जाती प्रमाणपत्र नॉन क्रिमीलेअर व अधिवास प्रमाणपत्र अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. तरी सगळ्या विद्यार्थ्यांनी 15 मे 2023 त्यापूर्वी जाती प्रमाणपत्र, डोमेसाईल व जात प्रमाणपत्र तयार करावी.

सद्यस्थितीत खालील कागदपत्रां आधारे अर्ज करता येईल:
•फोटो
•स्वाक्षरी
•आधार कार्ड
•९वी ची गुणपत्रिका
•१० वी बोर्ड परीक्षेचं प्रवेशपत्र

आर्थिकपरिस्थितीबिकटअसणाऱ्या व पुढे विज्ञान शाखा घेऊन शिकण्याची तयारी असणाऱ्या ( ओबीसीक, (एसबीसी) व (एनटी) जातीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना फ्री टॅब व सहा जिबी रोज इंटरनेट डाटा निःशुल्क पुरविण्यात येणार आहे. जे विद्यार्थी २०२३ मध्ये दहाव्या वर्गाची परीक्षा देत आहेत. ते विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र आहेत.

१० एप्रिलपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर (महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास व बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था) मार्फत राज्यातील विद्यार्थ्यांसाठी मोफत टॅबलेट, इंटरनेट, पुस्तके, ऑनलाईन प्रशिक्षण आणि मोफत मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जात आहे.

महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी MH-CETI/JEE/NEET २०२३ या परिक्षांच्या ऑनलाईन पूर्व तयारीसाठी फ्री टॅबलेट योजना आपल्या राज्यात महाज्योतीकडून राबवली जात आहे. या योजनेसाठी OBC, VJNT, SBC या प्रवर्गामधील नॉनक्रिमिलेअर उत्पन्न गटातील इच्छुक विद्यार्थ्यांकडून विहीत नमुन्यातील अर्ज www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहे. सन २०२३ मध्ये होणाऱ्या MH-CET/JEE/NEET परीक्ष्यांसाठी विध्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

फ्री टॅबलेट स्कीम चे उद्दिष्ट्य काय?

महाज्योतीच्या या योजनेच्या माध्यमातून सन २०२१ मध्ये राज्यातील ११ वी मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जेईई (JEE), नीट (NEET) आणि सीईटी (CET) परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट्य आहे.
दहावी नंतर अनेक विद्यार्थ्यांना इंजिनिअर (Engineering) आणि मेडिकलसाठी (Medical) तयारी करायची असते. मात्र, आर्थिक परिस्थिती नसल्याने महागडे कोचिंग क्लासेस लावणं त्यांना शक्य होत नाही. अश्या गरीब विद्यार्थ्यांचेइंजिनीरिंग आणि मेडिकल मध्ये प्रवेश घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाज्योती संस्थेने हा ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे.

फ्री टॅबलेट योजना 2022 लाभ (Benefits) कोणते?

1. विद्यार्थ्यांना महाज्योती संस्थेच्या वतीने पात्र विद्यार्थ्यांना जेईई, नीट आणि सीईट परीक्षांसाठी मोफत ऑनलाईन प्रशिक्षण दिलं जाणार आहे.
2. तसेच या ऑनलाईन प्रशिक्षणासाठी परीक्षेची पुस्तके, मोफत टॅबलेट आणि दररोज ६ जीबी इंटरनेट डेटा देण्यात येणार आहे.

फ्री टॅबलेट योजना 2022 आवश्यक कागदपत्रे कोणती? (Documents of Tablet Yojana Maharashtra)

1.9उत्तीर्ण गुणपत्रिका 10 HALL TICET,AADHE CARD
2. अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्यासंबंधी कागदपत्रं
3. ओबीसी,भटक्या जाती-जमाती आणि विशेष मागास प्रवर्गाचं जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.
4. नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र आवश्यक आहे.

फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र 2022 पात्रता (Eligibility) काय?

  • महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा.
  • या योजेनेचा अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांने यावर्षी दहावी परीक्षा उत्तीर्ण केलेली हवी आणि अकरावीसाठी विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असणे आवश्यक आहे.
  • ओबीसी (OBC), भटक्या जाती-जमाती (VJNT) आणि विशेष मागास प्रवर्गातील (SBC) विद्यार्थ्यांना या योजनेसाठी लाभ घेण्यास पात्र आहेत.
  • शहरी विभागात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेत ७० % तर ग्रामीण, आदिवासी किंवा नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना ६०% गुण असणे आवश्यक आहेत.

फ्री टॅबलेट योजनेचे रजिस्ट्रेशन (Registration) कुठे करायचे?

  • महाज्योतीच्या मोफत प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
  • त्यासाठी विद्यार्थ्यांना महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या ऑफिसिअल वेबसाईटवर जायचं आहे
  • तिथे नोटीस बोर्डवर क्लिक करून आपला प्रवेश अर्ज अपलोड करायचा आहे.

मोफत टॅबलेट योजनेसाठी अर्ज कसा व कुठे करावा?

  • सर्वप्रथम तुम्हला महाज्योतीच्या ऑफिसिअल वेबसाइट वर म्हणजेच https://mahajyoti.org.in/ या वेबसाइट ला भेट द्यावी लागेल.
  • यानंतर तुम्हला खाली स्क्रोल करून उपक्रम यामध्ये ‘MH-CET/JEE/NEET या परिक्षांच्या २०२३ करिता ऑनलाईन पूर्व तयारीसाठी नोंदणी’ याखालील Read More यावर क्लिक करायचे आहे.
  • आत्ता तुमच्यासमोर नवीन पृष्ठ उघडेल. त्यामध्ये तुम्हाला Click Here For Registration (नोंदणी अर्ज) यावर क्लिक करायचे आहे.
  • तुमच्यासमोर आत्ता खालील पृष्ठ उघडेल. त्यामध्ये तुम्हला कागदपत्रे अपलोड करायचे आहेत. त्याची लिंक खाली दिलेली आहे.
  • कागदपत्रे अपलोड करण्यासाठी यावर क्लिक करा.
Free Tablet Scheme Online Apply Form Maharashtra 2021
  • कागदपत्रे अपलोड केल्यानंतर Upload या बटनावर क्लिक करा.
  • आत्ता तुमच्यासमोर एक फॉर्म ओपन होईल. या फॉर्ममध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती भरायची आहे.
  • शेवटी फॉर्मच्या खाली दिलेल्या Submit ऑपशन वर क्लिक करायचे आहे.
  • तसेच खालील Print This Form यावर क्लिक करून फॉर्मची प्रिंट आऊट काढून ठेवायची आहे.
  • अश्या प्रकारे टॅबलेट योजनेसाठीची अर्ज प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण होईल.