चंद्रपूर जिल्हयातील १५ तालुक्याकरीता Sickle Cell Peer Support/Educator या पदाकरीता

556

राष्ट्रीय आरोग्य अभियान
जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, चंद्रपूर
जाहिरात क्र. १ ( सन २०२२-२३)

अर्ज स्विकारण्याची अंतीम तारीख दि. १३/०४/२०२३ रोजी सायं ०५.३० वाजे

जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, चंद्रपूर अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रमाची अंमलबजावणी व सनियंत्रणाकरीता चंद्रपूर जिल्हयातील १५ तालुक्याकरीता Sickle Cell Peer Support/Educator या पदाकरीता कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात खालील अहर्ताधारक पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
१) उमेदवार सिकलसेल ग्रस्त (ss) किंवा वाहक (AS) असावा, परंतु शारीरिक दृष्ट्या सक्षम असावा.

२) उमेदवाराची शैक्षणिक अर्हता १२ वी पास असावी. विज्ञान विषयास प्राधान्य राहील.

(३) MSCIT उत्तीर्ण असावा.

४) तोंडी चाचणीत उमेदवाराच्या वकृत्वास प्राधान्य देण्यात येईल.

५) ज्या तालुक्यात नेमणुक करावयाची आहे. त्या तालुक्यातील रहिवासी उमेदवारास प्राधान्य राहील. .

६ ) प्रोत्साहन भत्ता रु.८,०००/- व रु.२०००/- प्रवास भत्ता प्रतिमहा देय राहील.

७) सदर पदांना HPLC तपासणीचा अहवाल बंधनकारक असुन वयोमर्यादा १८ ते ३८ वर्ष राहील

अर्जाचा नमुना व इतर आवश्यक संपुर्ण माहितीकरीता जाहिरात https://chanda.nic.in/ आणि https://zpchandrapur.maharashtra.gov.in/en या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली
आहे.
अर्ज स्विकारण्याची अंतीम तारीख दि. १३/०४/२०२३ रोजी सायं ०५.३० वाजे पर्यंत राहिल. त्यानंतर प्राप्त होणारे अर्ज स्विकृत करण्यात येणार नाही, यांची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
स्वा/- अध्यक्ष
जि. ए. आ.व कु. क. सोसायटी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, चंद्रपूर
स्वा/- सदस्य सचिव
जि. ए. आ.व कु. क. सोसायटी तथा जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद, चंद्रपूर
स्वा/- सदस्य
जि.ए. आ.व कु. क. सोसायटी तथा जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय, चंद्रपूर

Sickle Cell Peer Support / Educator पदाच्या जबाबदाऱ्या व कर्तव्य
१) तालुक्यातील सर्व वाहक व ग्रस्त रुग्णांचे यादी दरमहा अदयावत करणे.
२) तालुक्यातील सर्व गरोदर माता वाहक व ग्रस्त रुग्णांचे यादी दरमहा अदयावत करणे.
३) तालुक्यातील Solubility तपासणी मध्ये संशयित रुग्णांचे HLL मार्फत HPLC तपासण्या करुण अहवाल प्राप्त करुण घेणे व त्यानुसार कार्ड बनवणे.
४) शिबिर, शाळा, Colleges मध्ये सिकलसेल आजाराचा प्रसार व प्रतिबंध याचे मार्गदर्शन करणे, विवाहपूर्व
व्यक्तींचे सुपदेशन करणे, सर्व वाहक व ग्रस्त रुग्णांचे समुपदेशन करणे, गरोदर मातांना या आजाराच्या
प्रतिबंधासाठी प्रसुतीपुर्व तपासणी बाबत समुपदेशन करणे.
रुग्णांच्या रक्तसंक्रमणाची, औषधोपचारासाठी समन्वय साधने व याबाबत यादी अदयावत करणे.
६) SBTC कार्ड, संजय गांधी निराधार योजना, अपंगत्व प्रमाणपत्र, MJPJAY / PMJAY याबाबत माहिती देऊन त्याचा लाभ देणे तसेच तालुक्यातील खाजगी दवाखान्यास MJPJAY / PMJAY या अंतर्गत सिकलसेल
आजारासाठी empanel करण्यासाठी प्रवृत करणे.
७) सिकलसेल रुग्णांच्या मृत्युच्या कारणाबाबत माहिती अदयावत ठेवणे.
८) टेलीमेडीसिन सेंटरला संदर्भीत केलेल्या रुग्णांचा पाठपुरावा करणे.
वरील सर्व कामाकरीता उप जि रु, ग्रारु, प्रा. आ. केंद्र स्तरावरील नियमित भेटी देणे.
१०) जिल्हा सिकलसेल समन्वयक यांच्या सहयोगाने कामे करणे.
११) जिल्ह्याअंतर्गत आयोजित होणाऱ्या वेगवेगळया शिबिराला उपस्थित राहुन सहकार्य करणे अनिवार्य राहील.
१२) जिल्हा सिकलसेल समन्यक यांना कामात मदत करणे.
१३) तालुकास्तरावर ASHA / ANM / MPW / MO / THO यांच्याशी समन्वयाने सिकलसेलचे काम करावे व मासिक अहवाल अदयावत व अचूक ठेऊन जिल्हा सिकलयेल समन्वयक यांचे कडे दरमहा २ तारखेपर्यंत सादर करावा.
१४) तालुकास्तरावर THO कार्यालयात व जिल्हास्तरावर DHO कार्यालयात त्याच्या मार्गदर्शनात कार्यरत राहावे.